शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गाडीतून बाहेर काढलेल्या सिंहाच्या तोंडातून टपकत होतं रक्त, 'त्या' थरारक घटनेचे फोटो इंटरनेटवर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 19:21 IST

सहजासहजी न दिसणारे जंगली प्राणी जवळून पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग ते अशा प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी सफारी पार्कमध्ये (Safari Park) गाडीने जातात. तिथे गेल्यानंतर हे प्राणी जेव्हा आपल्या गाड्यांजवळ येतात तेव्हा ते काहीजणांना ते खूप क्युट वाटतात, पण शेवटी ते हिंस्र प्राणी. कितीही क्युट वाटले तरी कधी हल्ला करतील हे सांगणे मुश्कील आहे.

सहजासहजी न दिसणारे जंगली प्राणी जवळून पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग ते अशा प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी सफारी पार्कमध्ये (Safari Park) गाडीने जातात. तिथे गेल्यानंतर हे प्राणी जेव्हा आपल्या गाड्यांजवळ येतात तेव्हा ते काहीजणांना ते खूप क्युट वाटतात, पण शेवटी ते हिंस्र प्राणी. कितीही क्युट वाटले तरी कधी हल्ला करतील हे सांगणे मुश्कील आहे.अशाच एका महिलेवर सिंहाने केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला.

हे प्रकरण  २०१५ सालातील असून  गेम ऑफ थ्रोन्स या गेम शोची एडिटर कॅथरीन चॅपल (Katherine Chappell) यांच्याबाबतीत घडलेलं आहे. कॅथरीन साऊथ आफ्रिकेतील सफारी पार्कमध्ये  (Lion Attack At Safari Park) फिरायला गेली. तिथं तिच्यावर सिंहाने भयंकर हल्ला केला. कॅथरीनच्या कारच्या मागे असलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात हे खतरनाक दृश्य कैद झालं. या व्यक्तीने आता या भयंकर घटनेचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. बेन गोवंडेर असं या पर्यटकाचं नाव आहे.

बेनने सांगितलं की, सिंह कॅथरीनच्या कारच्या खिडकीतून आत डोकावत होता. सिंहानं आपलं तोंड कारच्या खिडकिच्या आत टाकलं आणि तो तिचं तोंड चाटू लागला. चाटता चाटता सिंहाने तिच्या चेहऱ्याचे लचके तोडायला सुरुवात केली. सिंहाने जेव्हा आपलं तोंड खिडकीतून बाहेर काढलं तेव्हा त्याचं तोंड रक्ताने माखलं होतं. त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं आणि तो मांस चावत होता.

हे इतक्या अचानक झालं की काय करावं हे कुणाला समजलंच नाही. कॅथरीनसोबत त्या कारमध्ये टूरिस्ट गार्डही होती.  गार्डने तिला वाचवण्यासाठी सिंहाच्या तोंडावर मुक्का मारला पण तरी सिंहाने कॅथरीनला सोडलं नाही. ही घटना प्रत्यक्षात पाहून गार्डला हार्ट अटॅकही आला. कॅथरीनला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला, असं बेनने सांगितलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया