शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रोफेसरची नोकरी सोडून मासेविक्री करणाऱ्या ‘या’ तरुणाला लोकांनी वेडा म्हणून हिणवलं, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 9:25 AM

शिक्षणानंतर मोहन कुमार एका खासगी कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला.

ठळक मुद्देमोहनने मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली आहेआई-वडील पलानीवेल आणि सेल्वारानी या गांधीग्राम येथे फिश फ्राईचं दुकान चालवतातमाझ्या नोकरीपेक्षा या कामावर जास्त प्रेम करतो असं मोहनने सांगितले

करुर – कॉलेज प्रोफेसरची नोकरी सोडून ही व्यक्ती मासे विकू लागली हे ऐकून धक्का बसला ना! सामान्य नोकरदार वर्ग महिन्याला येणाऱ्या कमाईवर आपलं घर चालवतो, अशात जर नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार खूप कमी लोक करतात. व्यवसाय केला तर आपल्याला त्यात यश मिळेल की नाही? नोकरी सोडणं धोक्याचं होईल असा विचार मनात येत राहतो.

शाहरुख खानच्या सिनेमातील एक डायलॉग आहे ‘कोई धंधा छोटा नही होता और धंधे से बडा कोई धर्म नही होता’ त्यासाठी कामाशी प्रामाणिक असणं गरजेचे आहे. ही कहाणी आहे २७ वर्षीय मोहन कुमार याची. तामिळनाडू येथील करुर येथे मोहन कुमार आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या कुटुंबाचा फिश कोल्ड स्टोरेजचा कौटुंबिक व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मोहन कुमार याने कॉलेजमधील प्रोफेसरची नोकरी सोडून दिली.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मोहनने मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर मोहन कुमार एका खासगी कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला. मात्र नोकरीसोबत त्यांनी घरातल्या मासेविक्रीच्या व्यवसायाकडेही लक्ष दिलं. मोहनचे आई-वडील पलानीवेल आणि सेल्वारानी या गांधीग्राम येथे फिश फ्राईचं दुकान चालवतात. कॉलेजला असताना मोहन कॉलेज सुटल्यावर दुकानात येऊन आई-वडिलांच्या कामात मदत करायचा. मात्र मोहनच्या या कामामुळे आई-वडील नाराज होत असे.

मोहनने कौटुंबिक व्यवसायात न येता जीवनात मोठं काम केलं पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण करावीत अशी आई-वडिलांची इच्छा होती. इंजिनिअरींग केल्यानंतर मी मासांचा व्यवसाय करु लागलो तेव्हा अनेक लोक मला मुर्ख बोलायचे. मात्र मी माझ्या नोकरीपेक्षा या कामावर जास्त प्रेम करतो असं मोहनने सांगितले. जेव्हा मोहनची आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळली होती त्यावेळी दुकान बंद करावं लागलं होतं. पण या व्यवसायामुळे त्यांना आर्थिक उभारी मिळाली. मला या व्यवसायात अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या. तेव्हा माझे कुटुंबानेही साथ दिली नाही. मात्र आता मोहन करुर येथील हॉटेल्स आणि छोट्या दुकानांमध्ये दोन ते तीन टन मासे आणि मीठ उपलब्ध करुन देतो. या कामातून त्याला महिनाकाठी १ लाख रुपये फायदा होतो. हा व्यवसाय मोहनला आणखी वाढवायचा आहे असं त्याने सांगितले.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीjobनोकरी