लव्ह इन द एअर! आता फ्लाइटमध्येही मिळणार हनीमून सूट; एअरलाइन्सनं सुरू केली कपल्ससाठी खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:02 PM2021-11-16T12:02:06+5:302021-11-16T12:03:10+5:30

हनीमून एकदम स्पेशल असायला हवा असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. त्यामुळे अगदी लोकेशन पासून ते त्यासाठीच्या तयारीसाठी कपल्स खूप प्लानिंग करत असतात.

las vegas love cloud vegas charters jets to nowhere for horny mile high clubbers | लव्ह इन द एअर! आता फ्लाइटमध्येही मिळणार हनीमून सूट; एअरलाइन्सनं सुरू केली कपल्ससाठी खास सुविधा

लव्ह इन द एअर! आता फ्लाइटमध्येही मिळणार हनीमून सूट; एअरलाइन्सनं सुरू केली कपल्ससाठी खास सुविधा

Next

हनीमून एकदम स्पेशल असायला हवा असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. त्यामुळे अगदी लोकेशन पासून ते त्यासाठीच्या तयारीसाठी कपल्स खूप प्लानिंग करत असतात. लग्न बंधनात अडकल्यानंतर आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण एन्जॉय करण्यासाठी जोडपी वेगवेगळ्या हनीमून डेस्टीनेशन्सना भेट देत असतात. पण अमेरिकेच्या लास वेगसमध्ये आता एक 'रॉयल' सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

तुम्हाला तुमचा हनीमून एकदम खास करायचा असेल तर लव्ह क्लाउड जेट चार्टर नावाच्या कंपनीनं एक खास सुविधा सुरू केली आहे. खासगी फ्लाइटमध्ये चक्क हनीमून स्पेशल सूट उपलब्ध करुन देण्याची नवी सुविधा कंपनीनं सुरू केली आहे. पण यासाठी खिसा खूपच रिकामी करावा लागणार आहे. हनीमून स्पेशल फ्लाइटचं बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ९९५ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७३ हजार रुपये खर्च करावे लागतील आणि तेही फक्त ४५ मिनिटांची राइडचा यात समावेश असणार आहे. 

विमानात एक खास रॉयल हनीमूनसाठी आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विमान जवळपास ४५ मिनिटं हवेत असतं. पण तुम्हाला वेळ वाढवायचा असेल तर त्यासाठी अधिकचे पैसेही मोजावे लागतील. दीड तासासाठी तब्बल १ लाख रुपयांहून अधिक रुपये मोजावे लागतील. पण विमानातील सेवा, सुविधा पाहून तुम्ही नक्कीच तुमचा हनीमून स्पेशल करु शकता यात शंका नाही. 

विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दोन मिनिटांनी कपल आपले सीटबेल्ट काढू शकतात. विमानात एक क्वीन बेडची सुविधा देण्यात आली आहे. सिंगल पायलट असलेलं हे विमान असून पायलटा कॉकपिटमधून विमानात प्रवेश करण्याची सुविधा नाही. त्यामुळे कपलला देखील प्रायव्हसी मिळते. आतापर्यंत काही जोडप्यांची संपर्क साधल्याची माहिती देखील पायलटनं दिली आहे. लव्ह क्लाउड आणि त्यांची कंपनी गेल्या सात वर्षांपासून खास ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देत आहेत. यात रोमँटिक डिनर, विमानात लग्न अशा सुविधांचा समावेश होता. आता विमानात हनीमूनचीही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

Read in English

Web Title: las vegas love cloud vegas charters jets to nowhere for horny mile high clubbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.