Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 15:39 IST2018-12-12T15:32:16+5:302018-12-12T15:39:21+5:30
अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी शो जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला.

Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...
कोरिया : कोरियामधील एका टीव्ही शो दरम्यान एक अशी घटना घडली. ती घटना सर्वांना धक्का बसणारी होती. येथील SPOTV वाहिनीवर एनबीए सेगमेंट सुरु होते. तेव्हा अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला.
यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ SPOTV वाहिनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये लाईव्ह टीव्ही शो दरम्यान दोन अँकर बसून बातम्या सांगत होते. त्यावेळी अँकर जो ह्यून इल यांच्या नाकातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, रक्त येत असतानाही त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहून बातम्या सांगणे सुरुच ठेवले. यावेळी बाजूला असलेले अँकर त्यांच्याकडे पाहून घाबरल्याचे दिसून आले.
Bloody Nose of the Day goes to SpoTV NBA color commentator Jo Hyun-il
— Dan Kurtz (@MyKBO) December 6, 2018
pic.twitter.com/j7VrI9gP4D
दरम्यान, जो ह्यून इल यांनी अशा परिस्थितीत न डगमगता शो सुरुच ठेवला. त्यामुळे त्यांचे सोशल मिडीयात कौतुक करण्यात येत आहे. तसेच, हा व्हिडीओ सोशल मिडीयात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.