७ वर्षांआधी दुकानाचं नाव ठेवलं होतं 'कोरोना', आता होतोय अधिक फायदा!

By अमित इंगोले | Published: November 20, 2020 11:08 AM2020-11-20T11:08:57+5:302020-11-20T11:12:57+5:30

जगभरात पसरलेल्या या महामारीच्या ७ वर्षाआधीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचं नाव 'कोरोना' ठेवलं होतं.

Kerala corona store opened 7 years ago in Kottayam | ७ वर्षांआधी दुकानाचं नाव ठेवलं होतं 'कोरोना', आता होतोय अधिक फायदा!

७ वर्षांआधी दुकानाचं नाव ठेवलं होतं 'कोरोना', आता होतोय अधिक फायदा!

Next

कोविड १९ महामारीनंतर 'कोरोना' हा शब्द लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळतो. जगभरात पसरलेल्या या महामारीच्या ७ वर्षाआधीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचं नाव 'कोरोना' ठेवलं होतं. पण हे दुकान आपल्या वस्तुंमुळे नाही तर नावामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षात जेवढं दुकान चर्चेत आलं नाही तेवढं आता आलं आहे.

कोट्टयमचे जॉर्ज या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी सात वर्षांआधी या दुकानाचं नाव कोरोना ठेवलं होतं. पण त्यांना त्यावेळी जराही अंदाज नव्हता की, एक दिवस या नावाने जग घाबरेल आणि याच नावाने दुकान चर्चेत येईल. त्यांनी सांगितलं की, कोरोना महामारीनंतर त्यांच्या दुकानात लोक जास्त येऊ लागले आहेत.

जॉर्ज यांनी सांगितले की, 'कोरोना हा एक लॅटिन शब्द आहे. ज्याचा अर्थ क्राउन(मुकूट) असा होतो. मी सात वर्षांआधी माझ्या दुकानाचं हे नाव ठेवलं होतं. आता हे नाव व्यापारासाठी फायदेशीर ठरत आहे'. या दुकानात तुम्हाला किचन, वार्डरोबचं सामान, प्लांट आणि पॉट मिळतात. 
 

Web Title: Kerala corona store opened 7 years ago in Kottayam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.