कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात कॅन्सरग्रस्त महिलेने जिंकले एक कोटी रुपये
By Admin | Updated: October 17, 2014 18:51 IST2014-10-17T18:51:19+5:302014-10-17T18:51:19+5:30
कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात सौ. मेघा पाटील या कॅन्सरग्रस्त महिलेने एक कोटी रुपये जिंकले आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात कॅन्सरग्रस्त महिलेने जिंकले एक कोटी रुपये
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १७ - कौन बनेगा करोडपतीच्या आठव्या पर्वात सौ. मेघा पाटील या कॅन्सरग्रस्त महिलेने एक कोटी रुपये जिंकले आहेत. सौ.पाटील या नुकत्याच स्तनांच्या कॅन्सरमधून ठिक झाल्या असून त्या आतड्यांच्या कॅन्सर सोबत लढा देत आहेत. येत्या २० ऑक्टोबर रोजी सोनी टिव्ही वर हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. सौ. पाटील यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. जिंकलेली रक्कम मुलांच्या शिक्षणा करता आणि औषधउपचाराकरता वापरणार असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले आहे. त्यांच्या मुलीला आर्किटेक्चर व्हायचे असून मुलगा एमबीए करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमादरम्यान त्यांना वैयक्तिक जिवनाविषयी विचारले असता त्यांनी त्यांनी या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले आहे. सौ. पाटील यांनी सांगितले की, २००६ साली मला स्तनांचा कर्करोग झाला होता त्याकरता तब्बल ३५ लाख रुपये खर्च आला होता. आत्ता मी आतड्याच्या कर्करोगासोबत लढा देत आहे. त्यांच्या मुलाने या खेळात सहभागी होण्यासाठी प्रत्साहन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या पतीने कॅन्सर ही अतिशय शुल्लक बाब आहे असे कायम त्यांना दर्शवले, कोणत्याही प्रकारचे दडपण त्यांनी आपल्या चेह-यावर दाखवले नाही. मी इतकी मोठी रक्कम कधी जिंकू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या अनेक मैत्रिणींना माझ्याकडून प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितल्याने मला आनंद वाटतो असे सौ. पाटील यांनी म्हटले आहे.