शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जबरा फॅन! 15 तास खर्च करून पाठीवर काढला मोदींच्या चेहऱ्याचा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 10:34 AM

रायचूर- पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे चाहते सगळीकडेच आहेत. तसंच मोदी न आवडणाऱ्या लोकांची संख्याही तितकीच आहे. पण कर्नाटकातील मोदींचा एक चाहता सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकी ला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील एका व्यक्तीनं आपल्या शरीरावर मोदींचा मोठा टॅटू गोंदवून घेतला आहे. हा ...

रायचूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते सगळीकडेच आहेत. तसंच मोदी न आवडणाऱ्या लोकांची संख्याही तितकीच आहे. पण कर्नाटकातील मोदींचा एक चाहता सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील एका व्यक्तीनं आपल्या शरीरावर मोदींचा मोठा टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू पूर्ण करण्यासाठी टॅटू आर्टिस्टला जवळपास १५ तास लागले.

कर्नाटकमधल्या रायचूरमध्ये राहणाऱ्या बसवराज यांनी आपल्या पाठीवर मोदींचा टॅटू गोंदवून घेतला आहे. मोदींना पाठिंबा दर्शविण्यासाठी बसवराज यांनी टॅटू गोंदवून घेतला.  जे गेल्या कित्येक वर्षांत शक्य झालं नाही ते मोदींनी ४ वर्षांत करून दाखवलं. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मी हा टॅटू पाठीवर गोदंवून घेतला असल्याची माहिती बसवराज यांनी दिली. बसवराज त्यांच्या गावापासून ४०० किलोमीटरचं अंतर पार करून तो बंगळूरुमध्ये गेले होते.

नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी त्याच्या नावाचा उल्लेख केला. ‘तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मोदींनी सर्वांसमोर माझ्या नावाचा उल्लेख केला. प्रचारात मोदींनी मला सक्रिय सहभाग घेण्यास सांगितला आहे. मी यापुढे जोमानं काम करेन’ असंही ते म्हणाले होते. बसवराज यांनी काढलेला टॅटू हा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८