1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:34 AM2021-03-12T09:34:47+5:302021-03-12T09:47:37+5:30

एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीवरून जाण्याचा कारनामा केला नव्हता. मात्र, आता तिने ते सुद्धा केलं आहे. करिना ओलियानीने इथिओपियातील उकडत्या लावा लेकला दोरीच्या मदतीने पार केलं. 

Karina Oliani traverses lava lake creates Guinness world record | 1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

Next

ही आहे करिना ओलियानी. ती ब्राझीलची अॅडवेंचरर आहे. तिने माउंट एव्हरेस्ट दोन वेळा उत्तर आणि दक्षिण बाजूने सर केला आहे. एनाकोंडासोबत पाण्यात राहिली आहे. विमानाच्या विंगवर उभी राहून आकाशात झेप घेतली आहे. पण तिने एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीवरून जाण्याचा कारनामा केला नव्हता. मात्र, आता तिने ते सुद्धा केलं आहे. करिना ओलियानीने इथिओपियातील उकडत्या लाव्हा लेकला दोरीच्या मदतीने पार केलं. 

इथिओपियाच्या अफार प्रांतात एर्टा आले नावाचा ज्वालामुखी आहे. इथे सतत धगधगता लाव्हा वाहत राहतो. इथे लाव्ह्याचं एक सरोवर तयार झालं आहे. या सरोवराच्या वर आणि आजूबाजूला सर्वात जास्त तापमान राहतं. या पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाणही म्हटलं जातं.

एर्टा आले ज्वालामुखीच्या वर एक खासप्रकारची दोरी लावण्यात आली होती. यानंतर करिनाने एक विशेष सूट, हेलमेट, ऑक्सीजन सिलेंडर लावला होता. हे सगळं करून तिने लेक पार केली. तिने ३२९ फूट ११.७ इंचाचं अंतर पार केलं. ज्यावेळी करिनाने लावा लेकचं क्रेटर पार केलं तेव्हा तेथील तापमान ११८७ डिग्री सेल्सिअस होतं.

हा कारनामा केल्यानंतर करिना ओलियानीच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेक़ॉर्ड नोंदवण्यात आलला आहे. GWR नुसार करिनाला एर्टा आले ज्वालामुखी पार करायचा होता. पण तिला एकाएकी ही रिस्क घ्यायची नव्हती. मग तिची मदत करण्यासाठी कॅनेडियन रिगिंग स्पेशलिस्ट फ्रेडरिक श्यूट आला. 

करिना ओलियानी १२ वर्षांनी असताना तिने स्कूबा डायविंगचा क्लास केला होता. त्यानंतर तिने काही खास प्रकारच्या स्वीमिंगशी संबंधित कोर्स केले. तिने समुद्रात शिकारी शार्क आणि व्हेलसोबत स्वीमिंग केलं आहे. तिच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. 

करिना आज एक डॉक्टर आहे. सोबत कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी फ्रन्ट लाइन वॉरिअर बनून समोर आली होती. तिच्याकडे डॉक्टरीचे दोन सर्टिफिकेट आहेत. पहिला इमरजन्सी मेडिसिन आणि दुसरा वाइल्डनेस मेडिसिन.

Web Title: Karina Oliani traverses lava lake creates Guinness world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.