शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

इथले पोलीस 'चहा-पाणी' मागत नाहीत; स्वत: देतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 11:32 AM

या पोलीस ठाण्यात सर्वांनाच जावंसं वाटेल

बिकानेर: पोलीस ठाण्यात जाण्याचा अनुभव फारसा चांगला नसतो असा एक समज आहे. त्यामुळे अनेक जण पोलीस ठाण्यात जाणं टाळतात. शहाण्यानं पोलीस ठाण्यापासून चार हात लांबच राहावं असंदेखील म्हटलं जातं. मात्र राजस्थानच्या बिकानेरमधील कालू पोलीस ठाण्यातील परिस्थिती अतिशय वेगळी आहे. पोलीस कायम चहा पाणी घेतात, असा अनुभव असतो. मात्र कालू पोलीस ठाण्यात चक्क पोलिसांकडून चहा पाणी दिलं जातं. देशभरातील 15,666 पोलीस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेलं कालू पोलीस ठाणं अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचारीवर्ग कायम मदतीसाठी तत्पर असतो. तक्रार करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चहा पाणी दिलं जातं. याशिवाय दुरून आलेल्या व्यक्तीला जेवणदेखील देण्यात येतं. कालू पोलीस ठाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. या ठिकाणी पान, तंबाखू खाऊन मारण्यात आलेल्या पिचकाऱ्यांचे डाग कुठेही दिसत नाहीत. महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष, बॅटमिंटन कोर्ट अशा सुविधा कालू पोलीस ठाण्यात आहेत. पोलीस ठाण्यात आणि परिसरात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्मार्टफोनसोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील संशयास्पद हालचालींची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मोबाईलवर मिळते. ई-एफआयआरच्या माध्यमातून पोलीस ठाणं डिजिटल करण्यात आल्याचं स्टेशन हाऊस ऑफिसर देवी लाल यांनी सांगितलं. याशिवाय आरोपपत्रदेखील ऑनलाइन अपडेट केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे