सध्या सगळीकडे ख्रिसमस उत्सवाचं वातावरण असून अनेक सुट्टीत फिरायला जातात. असंच ख्रिसमस सुट्टीत बाहेर जाणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडलंय. ही घटना लंडन शहरातील असून इथे या मॉडेलच्या घरातून ५० मिलियन डॉलरचे दागिने चोरीला गेलेत. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ४७० कोटी रूपये इतकी होते.
शुक्रवार म्हणजे १३ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. Tamara असं या मॉडेलचं नाव असून ती ख्रिसमसच्या सुट्टीत घराबाहेर गेली होती. मागच्या बाजूने घर फोडून ही चोरी करण्यात आलीये.
Tamara ने सांगितले की, या दागिन्यांमध्ये तिच्या लग्नाच्या अनेक महागड्या रिंग्स होत्या. त्यासोबतच ८० हजार यूरोचे कानातले होते. चोर बागेतून घरात शिरला आणि त्याने सगळेच दागिने लंपास केले.
सध्या पोलीस या चोरीचा चौकशी करत आहेत. Tamara चे वडील Bernie Ecclestone फॉर्म्यूला वन रेसचे चीफ एक्झिक्यूटीव्ह होते. तसेच ते ब्रिटनमधील प्रसिद्ध उद्योगपती आहेत.