शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या सात दिवसांनंतर पत्नीला सिनेमाला घेऊन गेला, इंटरव्हलमध्ये फरार झाली पत्नी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:42 IST

Bride Run Away from Cinema Hall : लग्नाच्या सात दिवसांनंतर पती पत्नीला सिनेमा दाखवायला घेऊन गेला. पण इंटरव्हलमध्ये पत्नी पळून गेली आणि पती तिला शोधत राहिला.

Bride Run Away from Cinema Hall : कुणाच्याही आयुष्यात लग्न ही फार महत्वाची आणि मोठी बाब असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो तो हनीमून. ही नव्या आयुष्याची सुरूवात असते. पण विचार करा की, जर हनीमून दरम्यान थिएटरमध्ये सिनेमा बघताना जर एखाद्या व्यक्तीची पत्नी मधेच पळून गेली तर....? अशीच एक घटना जयपूरमध्ये घडली. इथे लग्नाच्या सात दिवसांनंतर पती पत्नीला सिनेमा दाखवायला घेऊन गेला. पण इंटरव्हलमध्ये पत्नी पळून गेली आणि पती तिला शोधत राहिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीकर इथे राहणाऱ्या तरूणाचं लग्न सात दिवसांआधी तिथेच राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. दोघेही हनीमूनसाठी जयपूरला गेले होते. यावेळी पिंक स्क्वायर मॉलमध्ये ते सिनेमा बघायला गेले. दोघेही दुपारी 12 ते 3 शो बघत होते. 

झालं असं की, जसा सिनेमाचा पहिला भाग झाला पती बाहेर काही खाण्यासाठी आणण्यासाठी गेला होता. याच वेळात पत्नी गपचूप तिथून गायब झाली. म्हणजे पत्नी इंटरव्हलमध्ये सिनेमा हॉलमधून फरार झाली. जेव्हा पती परत आला तेव्हा त्याला पत्नी सीटवर दिसली नाही. मग त्याने पूर्ण थिएटरमध्ये तिचा शोध घेतला. पण तिचा पत्ता कुठेच लागला नाही. फोन केला तर तिचा फोन स्वीच ऑफ होता. शेवटी तो पोलिसांकडे गेला आणि त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

एका दुसऱ्या मीडिया रिपोर्टनुसार, यादरम्यान थिएटरमधून फरार झालेली विवाहित महिला जयपूरच्या शाहपूरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिने पोलिसांना सांगितलं की, ती या लग्नाने आनंदी नाहीये आणि त्यामुळेच ती थिएटरमधून फरार झाली. आता दोन्ही परिवाराती लोक नवरीला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटके