शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या २१ वर्षानंतर पती बनला महिला, मग पत्नीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:37 IST

Rajasthan : आता कोर्टाने या अर्जाला मंजूरी दिली आहे. असं सांगितलं जात आहे की पत्नी पतीपासून काही वर्षापासून वेगळी राहत होती.

राजस्थानची (Rajasthan News) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाची एक अनोखी केस समोर आली आहे. लग्नाच्या २१ वर्षानंतर पतीने आपलं जेंडर चेन्ज (Husband Gender Surgery) केलं. याच आधारावर कोर्टाने पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. जोधपूरच्या ४५ वर्षीय पतीने आपली जेंडर सर्जरी केली आणि तो महिला बनला. पत्नीने या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता कोर्टाने या अर्जाला मंजूरी दिली आहे. असं सांगितलं जात आहे की पत्नी पतीपासून काही वर्षापासून वेगळी राहत होती. यावर कोर्टाने सांगितलं की, दोघेही वयस्क आहेत. त्यांना त्यांचं चांगलं वाईट समजतं.

मीडिया रिपोर्टनुसार, २०१७ पासून दोघे पती-पत्नी वेगळे राहत होते. दोघे एकत्र यायला तयार नव्हते. यादरम्यान पतीने जेंडर सर्जरी केली. आता पुन्हा त्यांच्यात पती-पत्नीचं नातं तयार होण्याची आशा नाही. आता दोघांना एकमेकांपासून वेगळं रहायचं आहे. कोर्टाने या गोष्टींचा विचार करून घटस्फोटाला  मंजुरीचा आदेश दिला. सूत्रांनी सांगितलं की, हा घटस्फोट दोघांच्याही मर्जीने झाला.

रिपोर्टनुसार, पती जोधरपूर आणि पत्नी जयपूरला राहणारी आहे. दोघांनी २०२१ मध्ये फॅमिली कोर्टात सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ते म्हणाले होते की, लग्नानंतर २०१७ पासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. यादरम्यान पतीने जेंडर चेन्ज केलं. आता त्यांच्यात पती-पत्नीसारखं नातं राहू शकत नाही.

दोघांमध्ये सेटलमेंट झाली आहे आणि त्यात कोणत्याही गोष्टीचा वाद नाही. तसेच ते येणाऱ्या काळात एकमेकांवर कोणतेही दोष लावणार नाहीत. त्यामुळे दोघांनी सहमतीने घटस्फोटाचा अर्ज दिला. आता कोर्टाने पती-पत्नीचा अर्ज मंजूर करत घटस्फोटाचा आदेश जारी केला. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानDivorceघटस्फोट