बाबो! 100, 200 नाही तर तब्बल 16 हजारांत 'या' ठिकाणी विकला एक फणस; 'हे' आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:11 PM2022-02-22T15:11:05+5:302022-02-22T15:28:14+5:30

Jackfruit Price : एका फणसाला चक्क 160 पौंड म्हणजे जवळपास 16 हजार रुपये किंमत मिळाली आहे.

jackfruit is selling in high price know about demand and market agriculture | बाबो! 100, 200 नाही तर तब्बल 16 हजारांत 'या' ठिकाणी विकला एक फणस; 'हे' आहे खास कारण

फोटो - TV9 hindi

googlenewsNext

फणस हा अनेकांना आवडतो. आपल्याकडे साधारण फणसाची किंमत ही 100-200 रुपये अशी असते. पण तुम्हाला जर कोणी एक फणस तब्बल 16 हजार रुपये किंमतीत मिळतोय असं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसला नाही. पण हो हे खरं आहे. लंडनमध्ये (London) एका फणसाला चक्क 160 पौंड म्हणजे जवळपास 16 हजार रुपये किंमत मिळाली आहे. तिथल्या सर्वांत जुन्या अशा बोरो मार्केटमध्ये एक फणस तब्बल 16 हजार रुपयांना विकला गेला आहे. बीबीसीच्या एका फोटोग्राफरने या फणसाचा फोटो काढला असून, तो ट्विटरवरून व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या फणसाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

ब्राझीलमध्ये फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. बांगलादेश आणि श्रीलंकेचं फणस हे राष्ट्रीय फळ आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कारण ब्राझीलच्या अनेक भागात फणस फक्त 82 रुपये किलो दराने विकला जातो. हा फोटो बघून ब्राझीलमध्ये अनेकांनी आता फणस विकून आपण कोट्यधीश होणार अशी कमेंट केली आहे. काही ठिकाणी फणस रस्त्यावरही टाकलेले दिसतात. इतरही काही देशांमध्ये फणस मोठ्या प्रमाणात पिकतात. मात्र योग्य सप्लाय चेन नसल्याने जवळपास 70 टक्के फणस वाया जातात.

झारखंडमधले फणस देशातल्या अनेक राज्यांमध्ये, परदेशातही पाठवले जातात

झारखंडमध्येदेखील फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. उन्हाळ्यात फणसाचा हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीला शहरी बाजारपेठेत 70 ते 80 रुपये किलो दराने, तर ग्रामीण बाजारपेठेत 40 ते 50 रुपये किलो दराने फणसांची विक्री होते. अलीकडच्या काही वर्षांत, स्थानिक बाजारपेठेत, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत असल्याने झारखंडमधले फणस देशातल्या अनेक राज्यांमध्ये आणि परदेशातही पाठवले जात आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फणस पाठवणं तसं जिकिरीचं ठरतं. कारण हे हंगामी फळ असून त्याचा आकारही खूप मोठा असतो. एका फणसाचं वजन 40 किलोपर्यंत असू शकतं. त्यामुळे त्याचं पॅकिंग आणि वाहतूक कठीण होतं.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढतेय

अलीकडच्या काळात विकसित देशांमध्ये शाकाहाराकडे वळणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढलं आहे. फणस शिजवल्यानंतर मांसासारखा दिसत असल्याने त्याचा वापर वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत आहे. फक्त ब्रिटनमध्ये शाकाहारी व्यक्तींची संख्या जवळपास 35 लाख असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून फणसाचा व्यवसायही वेगानं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 2026 पर्यंत फणसाची बाजारपेठ 35.91 कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. 2021-2026 पर्यंत 3.3 टक्के दराने वाढेल, असा अंदाज कन्सल्टन्सी इंडस्ट्री एआरसीने वर्तवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: jackfruit is selling in high price know about demand and market agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.