शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

काही लोकांनी पैसे जमा करून खरेदी केलं आयलॅंड, बनवला नवा देश; पोलिसही आहेत अन् सरकारही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:03 IST

या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे याला मायक्रो नेशन म्हटलं जात आहे. क्राउड फंडच्या माध्यमातून हे आयलॅंड विकत घेण्यासाठी पैसे जमा केले गेले.

बेलिज एक कॅरेबियन देश आहे. या देशाकडे १.२ एकराचे छोटे छोटे आयलॅंड आहेत. हे काही लोकांनी मिळून खरेदी केले आणि आता त्या लोकांना नवा देश तयार केल्याचा दावा केला जात आहे. पण या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे याला मायक्रो नेशन म्हटलं जात आहे. क्राउड फंडच्या माध्यमातून हे आयलॅंड विकत घेण्यासाठी पैसे जमा केले गेले.

letsbuyanisland.com वर या आयलॅंडचा भाग विकत घेता येतो आणि तेथील नागरिकताही मिळवता येते. १४ मार्च २०२२ पर्यंत या आयलॅंडच्या गुंतवणुकदारांची संख्या १०३ झाली आहे आणि नागरिकांची संख्या ३५० झाली आहे. या देशाचं अधिकृत नाव Principality Of Islandia आहे. या देशाकडे स्वत:चा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, सरकार आणि सीक्रेट पोलिसही आहेत. 

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, मार्सल मेअर लेट्स बान अॅन्ड आय़लॅंडचे को-फाउंडर आहेत. त्यांनी आणि त्यांच्या ग्रुपने मिळून Coffee Caye नावाच्या या आयलॅंडसाठी १ कोटी ९० लाख रूपये क्राउडफंडच्या माध्यमातून जमा केले.तेच याची किंमत १ कोटी ३७ लाख रूपये होती. याची विक्री डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. तसेच आयलॅंडच्या एका भागाची किंमत आता २ लाख ४८ हजारच्या आसपास ठेवली आहे. याचे आतापर्यंत १०० शेअर विकले गेले आहेत.

मार्शल मेअरने सांगितलं की, आयलॅंड बेलिज सिटीपासून १५ मिनिटांच्या बोट राइड अंतरावर आहे. २०२२ च्या सुरूवातील अनेक गुंतवणूकदार आणि पर्यटक इथे आले. मेअर म्हणाले की, त्या आयलॅंडवर उतरणं ज्यात तुम्ही स्वत: गुंतवणूक केली आहे, हा फार शानदार अनुभव असतो. 

आयलॅंड खरेदी करण्यासाठी क्राउड फंडिंगची आयडिया साधारण १५ वर्षाआधी आली होती. तेव्हा हारेथ जॉनसनने Letsbuyanisland.com चं डोमेन खरेदी केलं होतं. यावेळी टूरमध्ये मेअरसोबत गारेथ नव्हते. गारेथ यंग पायनिअर टूर्सचेही को फाउंडर आहेत. त्यांची कंपनी लोकांना नॉर्थ कोरिया आणि सीरियामध्ये फिरायला नेते. त्यासोबतच अशाही देशात फिरायला नेतात जे देश स्वत: स्वतंत्र असल्याचा दावा करतात. 

जे गुंतवणूकदार Coffee Caye मध्ये पैसे लावतील किंवा फिरायला येतील ते येथील नागरिक बनतील. यासाठी पासपोर्टची गरज पडणार नाही. त्यासोबतच लॉर्ड किंवा लेडी ऑफ आयलॅंडची उपाधीही फार कमी फीमध्ये खरेदी केली जाऊ शकेल. यासाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके