तुमच्या स्वप्नात आलीय का मृत व्यक्ती? झोपेत पडलेल्या स्वप्नामागे दडलंय रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:53 IST2022-03-28T19:52:55+5:302022-03-28T19:53:05+5:30
लॉकडाऊन काळात कोरोना आजाराने व्यापल्याची भीती लोकांच्या स्वप्नात जास्त पाहायला मिळाली. स्वप्नाचं कुठलंही वैज्ञानिक प्रमाण नाही. तरीही अनेकजण आजही स्वप्नाबाबत संशोधन करत आहेत.

तुमच्या स्वप्नात आलीय का मृत व्यक्ती? झोपेत पडलेल्या स्वप्नामागे दडलंय रहस्य
प्रत्येक मनुष्य स्वप्न पाहत असतो. झोपेतील प्रत्येकाची स्वप्न वेगळी अन् खासगी असतात. जी आठवणी, कल्पनारम्य आणि इतर गोष्टींशी निगडीत असतात. याबाबत तज्ज्ञांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. आपण स्वप्न का पाहतो? या स्वप्नाचा अर्थ काय असतो? हे समजणं थोडे कठीण जाईल. परंतु याचा अर्थ असाही नाही याला एक सिनेमाची कहाणी पाहिल्याप्रमाणे विसरून जाल.
२०१५ मध्ये चीन आणि जर्मनीच्या काही विद्यार्थ्यांनी केलेल्या स्टडीत शाळा, टीचर्स आणि शिक्षणाबद्दल अनेक गोष्टींचा समावेश होता. स्टडीत भाग घेतलेल्या बहुतांश जणांनी त्यांच्या स्वप्नाचा अनुभव शेअर केला होता. २०२१ वर्षी इटलीत झालेल्या लोकांच्या स्टडीत लॉकडाऊन काळात कोरोना आजाराने व्यापल्याची भीती लोकांच्या स्वप्नात जास्त पाहायला मिळाली. स्वप्नाचं कुठलंही वैज्ञानिक प्रमाण नाही. तरीही अनेकजण आजही स्वप्नाबाबत संशोधन करत आहेत.
कुणाचा पाठलाग करणे - जर तुम्हाला स्वप्नात कुणी तुमचा पाठलाग करतंय असं पाहिले याचा अर्थ तुम्ही कुठल्यातरी गोष्टीमुळे अथवा व्यक्तीपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताय. जो तुम्हाला नुकसान पोहचवू शकतो.
भीती – जर तुमच्या स्वप्नात भीती येत असेल तर त्याचा अर्थ तुमच्या जीवनात एखादी घटना नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे.
शाळेत असणे – अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर अस्पष्ट आहात. कदाचित तुम्ही अपेक्षांवर खरे उतरला नसाल अथवा अद्याप एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुमची तयारी नसेल.
उशीर होणे – ट्रेन, प्लेन अथवा बसच्या गर्दीत अडकणे म्हणजे हाती आलेली संधी हातातून जाण्याचे संकेत आहेत. तुम्ही स्वत: असुरक्षित असल्याची भावनेत आहात.
कामाचा तणाव – असं स्वप्न तुमच्या प्रोफेशनली आयुष्याशी निगडीत असते. ज्यातून तुम्हाला चिंता सतावत आहे. तुम्ही मोठ्या प्रेजेंटेशन अथवा डेडलाइनमुळे चिंतेत असाल.
दात पडणे – दात पडणे, हड्डी तुटणे म्हणजे तुम्हाला आरोग्य विषयक मोठं नुकसान होण्याचे संकेत असतात. किंवा भविष्यातील बदलांबाबत तुम्ही व्यथित आहात
मृत व्यक्तीला पाहणे – स्वप्नात जर एखाद्या मृत व्यक्तीला पाहत असाल तर तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करताय यावर निर्भर आहे. जर तो व्यक्ती प्रिय असेल तर तुम्ही त्याच्या दु:खात बुडालेले आहात. जर स्वप्नात भीतीदायक अथवा काहीतरी नुकसान पोहचवणारे असेल तर तुम्ही त्या भावनेतून आज जगत आहात.
सेक्स करणे – स्वप्नात अखेर काय होते आणि कशाची जाणीव होते यावर निर्भर आहे. हे सर्वसामान्य आहे. लैंगिक संबंधांबाबत प्रोत्सहित आणि संबंधाचे संकेत असतात.
नग्न होणे – या प्रकारची स्वप्न असुरक्षित, टीकात्मक अथवा गृहित धरण्याबाबत असू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा तुमच्या आसपासच्या लोकांनी पूर्ण कपडे घातलेले असतील.