शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एक लीटर इंधनात विमान किती किलोमीटर उडतं? वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 14:46 IST

Airplane Mileage : तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जास्तीत जास्त लोकांकडे नसतं.

Airplane Mileage : पेट्रोलचा भाव सध्या आसमानाला भिडले आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे लोक हैराण झाले आहेत. पण लोकांनी गाडी चालवणं काही थांबवलं नाहीये. सामान्यपणे लोक चांगल्या मायलेजच्या गाडीला प्राधान्य देतात. एखाद्या कोणत्याही गाडीचा मायलेज 35 ते 45 किमी प्रति लिटर इतका किंवा त्यापेक्षा थोडा जास्त असतो. तर काही गाड्यांचा मायलेज 15 ते 20 पर्यंत असतो. 

पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जास्तीत जास्त लोकांकडे नसतं. कारण त्यांनी याचा कधी विचारच केलेला नसतो. अशात आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत.

तुम्हाला कल्पना असेल की, इतर वाहनांच्या तुलनेत विमानाचं इंजिन अधिक मजबूत आणि मोठं असतं. जे इंधनावरच चालतं. पण हे इंधन पेट्रोल आणि डीझलपेक्षा वेगळं असतं. भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे विमानासाठी जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर केला जातो. तर याच्या प्रति लिटरची किंमतही वेगवेगळी असते.

बोइंग 747 सर्वात मोठ्या विमानांपैकी एक आहे. ज्यात एकाचवेळी 500 प्रवाशी प्रवास करू शकतात. या विमानाच वेग 900 किमी प्रति तास सांगितला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, बोइंग 747 विमानात एक सेकंदात चार लीटर इंधन खर्च होतं.बोइंग 747 सारखे मोठे विमान एक मिनिटात 240 लिटर इंधन खर्च करतात. तेच असे विमान एका लिटरमध्ये  केवळ 0.8 किमीपर्यंत प्रवास करू शकतात.

तसेच बोइंग ७४७ च्या तुलनेत एअरबस A32 विमान एका सेकंदात 0.683 लिटर इंधन खर्च करतात. त्यासोबतच बोइंग विमान एका तासात 14.400 लीटर इंधन खर्च करतं.

एका अंदाजानुसार, टोकियो ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एका बोइंग 747 विमानाला 187,200 लिटर इंधनाची गरज पडते. टोकियो ते न्यूयॉर्कचा प्रवास 13 तासांचा आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके