शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

King Cobra: किंग कोब्राबाबत आश्चर्यकारक खुलासा, वैज्ञानिकही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:23 IST

King Cobra Interesting Facts : एका सापाचे चार वेगवेगळे रूप बघितले जाऊ शकतात. क्रॉस ब्रीड केल्यानंतर किंग कोब्राचं भयावह आणि विषारी रूप बघायला मिळतं.

(Image Credit : Wikipedia)

King Cobra Interesting Facts :  जगातला सर्वात विषारी साप म्हणून किंग कोब्राला ओळखलं जातं. किंग कोब्राची लांबी साधारण १३ फूट असू शकते.  तसेच त्यांचा फणाही मोठा असतो. किंग कोब्राचं साम्राज्य भारतपासून ते इंडोनेशियापर्यंत पसरलेलं आहे. यांच्या चार प्रजातींचा जगभरात दबदबा आहे. जे किंग कोब्रा प्रजातींचे शाही वंशज आहे. एका सापाचे चार वेगवेगळे रूप बघितले जाऊ शकतात. क्रॉस ब्रीड केल्यानंतर किंग कोब्राचं भयावह आणि विषारी रूप बघायला मिळतं.

जगभरात आढळून आलेल्या किंग कोब्राच्या चार प्रजातींना अजूनपर्यंत अधिकृत नाव मिळालेलं नाही. पण त्यांना दक्षिण-पश्चिम भारताचा पश्चिमी घाट वंश, भारत आणि मलेशियाचा इंडो-मलायन वंश, पश्चिमी चीन आणि इंडोनेशियाचा इंडो-चायनीज वंश आणि फिलिपींसमध्ये आढळणारा लूजॉन आयलॅंड वंश या नावांनी ओखळलं जातं. चला जाणून घेऊ किंग कोब्राबाबत काही खास गोष्टी....

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये इवोल्यूशनरी इकोलॉजिस्ट आणि या रिसर्चचे लेखक कार्तिक शंकर म्हणाले की, ही हैराण करणारी बाब आहे की, किंग कोब्राच्या अनेक प्रजाती आहेत. कारण हे साप एकसारखेच दिसतात. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, या भागांनुसार ते व्यवहार करतात.

अनेक समानता असूनही हे साप वेगवेगळ्या भौगोलिक भागात राहतात. उदाहरणार्थ फिलिपीन्समध्ये आढळणाऱ्या कोब्राच्या शरीरावर धुसर ऑफ-व्हाइट रिंग आढळतात, तर थायलॅंडमध्ये आढळणाऱ्या सापाच्या शरीरावर चमकदार असतात.

कोब्रा असा साप आहे जो आजूबाजूच्या वस्तू एकत्र करून आपलं घर तयार करतो. ज्यात तो अंडी ठेवतो. वेगवेगळ्या देशांमध्ये अंड्याबाबत त्यांचा व्यवहार वेगवेगळा असतो. काही भागांमध्ये मादा किंग कोब्रा अंड्यांवर बसते तर कुठे अंडी सोडून दिली जातात.

वैज्ञानिक किंग कोब्राच्या व्यावहारिक आणि शारीरिक फरकांसोबतच चार प्रजातींमधील जेनेटिक फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकमध्ये कलिंगा सेंटर फॉर रेन फॉरेस्ट इकोलॉजीचे बायोलॉजिस्ट पी.गॉवरी शंकर म्हणाले की किंग कोब्राच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणं एक अवघड काम आहे. त्यांना पकडून ठेवणं आणि त्यांच्या जवळ जाऊन अभ्यास करणं धोकादायक ठरू शकतं.

ते म्हणाले की, किंग कोब्राचा अभ्यास करण्यात अडचणी येतात. किंग कोब्रामधील जेनेटिक फरक समजून घेण्यासाठी त्यांच्या टिमने ६२ किंग कोब्राचे स्पेसिमेन निवडून त्यांचा डीएनए सॅम्पल एकत्र केला. अभ्यासकांनी सर्वातआधी मयटोक्रॉन्डिअल जीन्सचा अभ्यास केला. असं केलं कारण आईकडून पिलांमध्ये हे ट्रान्सफर होतं. यातच चार वेगवेगळ्या प्रजातींची माहिती मिळाली. सर्वात मोठी बाब म्हणजे हे कोणत्याही एक स्थानिक प्रजातींचे नाही आणि त्यांच्यात संबंध नाही. ते जेनेटिकलीही वेगवेगळे आहेत. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके