शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कडक सॅल्यूट! पडद्यामागचा एक असा हिरो ज्याने वर्षभरापासून पाहिला नाही मुलीचा चेहरा, म्हणाला - समाजाला माझी जास्त 'गरज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:15 IST

Covid-19 Hero : आम्ही आज तुम्हाला कुणा सेलिब्रिटी किंवा अधिकाऱ्याबाबत नाही तर एक ड्रायव्हरबाबत सांगणार आहोत. एक असा टॅंकर ड्रायव्हर ज्याने आपलं काम करत असताना कितीतरी लोकांचे जीव वाचवले असतील.

(Image Credit : PTI)

गेल्यावर्षीपासून या कोरोना काळात कोरोना वॉरिअर्सची इतकी खास उदाहरणे समोर आली आहेत की, आपण त्यांना मनापासून सलाम करतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा वॉरिअरची कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही त्याला मनोमन सलाम तर करालच सोबतच त्याला आशीर्वादही द्याल.

आम्ही आज तुम्हाला कुणा सेलिब्रिटी किंवा अधिकाऱ्याबाबत नाही तर एक ड्रायव्हरबाबत सांगणार आहोत. एक असा टॅंकर ड्रायव्हर ज्याने आपलं काम करत असताना कितीतरी लोकांचे जीव वाचवले असतील. या व्यक्तीने स्वत:ला ड्युटीमध्ये इतकं वाहून घेतलं की, त्याने गेल्या एक वर्षापासून त्याच्या मुलीचा चेहराही पाहिला नाही. या बिहारच्या ड्रायव्हरचं नाव आहे शंकर मांझी. (हे पण वाचा : लॉकडाऊनमुळे गेली नोकरी तर स्मशानभूमीला बनवलं घर, अंत्यसंस्कार करून भरतो परिवाराचं पोट!)

शंकर गेल्या वीस वर्षांपासून कर्नाटक ते म्हैसूर दरम्यान ट्रक चालवण्याचं काम करतो. त्याच्या ट्रकमध्ये असते 'संजीवनी' म्हणजेच ऑक्सीजन सिलेंडर. शंकर म्हणाला की, यावेळी त्याची सर्वात जास्त गरज ही समाजाला आहे. त्यानेही हेही सांगितलं की, त्याने त्याच्या इतक्या वर्षाच्या कामात ऑक्सीजनची इतकी मागणी कधीही पाहिली नाही आणि इतक्या फेऱ्याही त्याने कधी मारल्या नव्हता.

बिहारचा राहणारा शंकर आणि त्याचा सहकारी मोहम्मद हकीकत या दिवसात आठवड्यातून  तीन तीन राउंड ट्रिप करत आहेत. त्यांना आठवड्यातून तीन दिवस म्हैसूरहून कोप्पलला ये-जा करावी लागते. म्हैसूरहून कोप्पलचं अंतर ४५० किमी आहे. इथे पोहोचण्यासाठी ८ तासांचा वेळ लागतो. दोन्हीकडील वेळ १६ तास होतो. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, शंकर आणि त्याचा सहकारी १६ तासांचा प्रवास न थांबता पूर्ण करतात.

शंकर म्हणाला की, 'रस्त्यावर अनेक प्रकारचे धोके असतात. अनेकदा ट्रकमध्ये काही समस्या निर्माण होते. पण आम्हाला या गोष्टीची कल्पना असते की, ऑक्सीजन पोहोचवण्यात उशीर झाला तर किती समस्या होऊ शकतात. याच कारणाने इमरजन्सीी दरम्यान आम्ही लोक ८ तास गाडी चालवत राहतो. यादरम्यान आम्ही चहासाठीही थांबत नाही. आम्हाला तोपर्यंत शांतता मिळत नाही जोपर्यंत टॅंकर पुन्हा प्लांटपर्यत पोहोचत नाही.

(Image Credit : indiatimes.com)

शंकरला एक पाच वर्षांची मुलगी आणि एक मुलगा आहे. तो परिवाराला कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भेटला नाही. शंकर म्हणाला की, जेव्हाही तो फोनवर मुलीसोबत बोलतो तेव्हा घरी जाऊन तिला भेटण्याचं मन होतं. पण नंतर वाटतं आता ड्युटी महत्वाची आहे. तो सांगतो की, त्याला या कामासाठी फक्त त्याचा पगार मिळतो. तो जो धोका पत्करतो आणि एक्स्ट्रा काम करतो त्याचा त्याला वेगळा भत्ता मिळत नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटके