शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मृत मुलीला दफन करण्यासाठी गेलेल्या पित्याला स्मशानातील खड्ड्यात सापडले अनमोल रत्न...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 08:57 IST

मृत मुलीचे दफन करण्यासाठी स्मशानभूमीत खड्डा खोदत असताना कुटुंबीयांना आत जे काही सापडले त्याबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.   

बरेली (उत्तर प्रदेश) - घेणाराही तोच आणि देणाराही तोच, या उक्तीचा प्रत्यय उत्तर प्रदेशमधील एका पित्याला नुकताच आला. काही वेळापूर्वीच जन्मलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ही व्यक्ती तिचा मृतदेह दफन करण्यासाठी स्मशानात घेऊन गेली. मात्र तिथे खड्डा खोदत असताना त्यांना आत जे काही सापडले त्याबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.   स्मशानात गेल्यावर मृत मुलीचे दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू झाले. तेवढ्यात खड्डा खोदत असताना तेथील कामगारांना त्यात एक हंडा सापडला. धक्कादायक बाब म्हणजे या हंड्यात जिवंत पुरलेली मुलगी सापडली. दरम्यान, पोटची लेक गेली असताना या मुलीच्या रूपात देवानेच आपल्याला हे कन्यारत्न भेट दिले, असे समजून सदर व्यक्तीने या मुलीचा स्वीकार केला. ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात घडली. या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले की, 'बरेली शहरातील सीबीगंज येथील वेस्टर्न कॉलनी येथील रहिवासी हितेश कुमार सिरोही यांच्या घरी गुरुवारी एका मुलीचा जन्म झाला होता. मात्र या नवजात मुलीचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांसह तिचे वडील अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. तिथे तिचा मृतदेह पुरण्यासाठी त्यांनी सुमारे तीन फूट खोल खड्डा खणला. त्यादरम्यान खड्डा खोदत असलेल्या कामगाराच्या फावड्याला एक हंडा लागला. हा हंडा बाहेर काढला असताना त्यात एक जिवंत नवजात मुलगी सापडली. बराच वेळ जमिनीखाली राहिल्याने तिचे श्वसन वेगात सुरू होते. दरम्यान, हितेश याने या मुलीचा स्वीकार केला.'' सध्या या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या मुलीला स्मशानात कुणी जिवंत पुरले याचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी सांगितले.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत