शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कडक सॅल्यूट! अमेरिकेतील नदीत बुडत होती लहान मुले, स्वत:चा जीव गमावून 'या' भारतीयाने दिलं त्यांना जीवनदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 4:10 PM

५ ऑगस्ट रोजी Reedley Beach हून तीन मुले किंग्स नदीत वाहून गेलीत. जेव्हा मनजीतने मुलांना बुडताना पाहिले तेव्हा त्याने कशाचाही विचार न करता नदीत मुलांना वाचवण्यासाठी उडी घेतली.

आपल्या जीवाची पर्वा न करता अनोळखी लोकांचा जीव वाचवणारे लोक आजही समाजात आहे. याचं एक उदाहरण अमेरिकेत नुकतंच बघायला मिळालं. इथे एका भारतीय पंजाबी तरूणाने नदीत बुडणाऱ्या तीन मुलांचा जीव वाचवला. मुले तर वाचली पण हा तरूणाने जगाचा निरोप घेतला.५ ऑगस्ट रोजी  Reedley Beach हून तीन मुले किंग्स नदीत वाहून गेली होती.

जेव्हा मनजीतने मुलांना बुडताना पाहिले तेव्हा त्याने कशाचाही विचार न करता नदीत मुलांना वाचवण्यासाठी उडी घेतली. एबीसी ३० च्या रिपोर्टनुसार, २९ वर्षीय मनजीत सिंह Fresno चा राहणारा होता. तो दोन वर्षांआधीच अमेरिकेत आला होता. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्याचा ट्रेनिंगचा पहिला दिवस होता. तो तिथे ट्रक ड्रायव्हिंग बिझनेससाठी गेला होता.

मनजीतला दोन ८ वर्षांच्या मुली आणि एक १० वर्षांचा मुलगा किंग्स नदीत बुडताना दिसले तर तो लगेच त्यांच्या मदतीसाठी धावून गेला. त्याने मुलांना वाचवलं, पण स्वत: पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. त्याने या मुलांची मदत करण्याआधी स्वत:बाबत एकदाही विचार केला नाही.नंतर आजूबाजूला असलेले लोक मदतीसाठी आले आणि त्यांनी मुलांना बाहेर काढलं. पण एक मुलगी १५ मिनिटे पाण्याच बुडून होती. तिची स्थिती नाजूक आहे. ती सध्या लाइफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. 

पोलीस कमांडर Marc ediger यांनी सांगितले की, सिंह कशाचाही विचार न करता मुलांना वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. दुर्दैवाने तो नदीत बुडाला आणि परत आला नाही. तो मुलांना ओळखत नव्हता. पण त्याने जसेही पाहिले मुले बुडत आहेत त्याने लगेच नदीत उडी घेतली. लोक मनजीतने केलेल्या कामाला सलाम करत आहेत. 

हे पण वाचा  :

१० वी च्या विद्यार्थ्यानं सोनू सूदकडे मागितला व्हिडीओ गेम; तेव्हा सोनू म्हणाला.... पाहा व्हायरल ट्वीट

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्यानं आईनेच हातगाडीला धक्के मारत मुलाला रुग्णालयात पोहोचवलं

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयsikhशीख