बाबो! झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी, देशातील 'ही' कंपनी ९ तास झोपेसाठी देतीये १ लाख रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:40 PM2019-11-29T14:40:12+5:302019-11-29T14:49:05+5:30

अनेकजण आपलं तेच तेच नेहमीच काम करून कंटाळलेले असतात. त्यांना ९ ते ६ ची रोजची नोकरी सोडून देण्याची इच्छा असते. सोबतच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छाही असते.

Indian company is offering a ‘sleep internship’ where you can nap for 9 hours and get paid ₹1 lakh | बाबो! झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी, देशातील 'ही' कंपनी ९ तास झोपेसाठी देतीये १ लाख रूपये!

बाबो! झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी, देशातील 'ही' कंपनी ९ तास झोपेसाठी देतीये १ लाख रूपये!

Next

(Image Credit : awarenessdays.com)

अनेकजण आपलं तेच तेच नेहमीच काम करून कंटाळलेले असतात. त्यांना ९ ते ६ ची रोजची नोकरी सोडून देण्याची इच्छा असते. सोबतच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छाही असते. अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. तसेच ज्या लोकांना सतत झोपणं प्रिय असेल अशांसाठीही ही बातमी महत्वाची आहे. कारण एक अशी नोकरी समोर आली आहे ज्यात तुम्हाला केवळ झोपायचं काम करायचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी भारतातील आहे.

(Image Credit : businessinsider.in)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  Wakefit.co नावाच्या कंपनीने Sleep Internship असा एक प्रोग्राम समोर आणला आहे. या इंटर्नशिप दरम्यान तुम्हाला रोज ९ तास झोपायचं आहे. जर लागोपाठ १०० दिवस तुम्ही हे झोपण्याचं काम करू शकलात तर तुम्हाला यासाठी १ लाख रूपये दिले जाणार आहेत. पण हे काम तेवढं सोपं नक्कीच नाही, जेवढं तुम्हाला वाटतंय.

(Image Credit : asianage.com)

हे काम मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीला हा विश्वास द्यावा लागेल की, झोप तुमच्यासाठी किती प्रिय आहे आणि का? इंटर्नशिप प्रोग्राम दरम्यान कंपनी व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीवरही लक्ष ठेवणार आहे. म्हणजे हे पाहिलं जाईल की, तुम्ही गादी कशा पद्धतीने झोपता. त्यासोबच कंपनीकडून काउन्सेलिंग आणि स्लीप ट्रॅकरही दिले जातील.

याबाबत Wakefit.co चे डायरेक्टर आणि को-फाउंडर Chaitanya Ramalingegowda यांनी सांगितले की, ते देशातील अशा बेस्ट स्लिपरच्या शोधात आहेत जे झोपण्यासाठी कोणतीही गोष्ट करू शकतात. या इंटर्नशिपसोबत या कंपनीकडून  'Right To Work Naps' अभियानही चालवलं जात आहे.


Web Title: Indian company is offering a ‘sleep internship’ where you can nap for 9 hours and get paid ₹1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.