स्वित्झर्लंडमध्ये वाढतंय सुसाईड टुरिझम

By Admin | Updated: August 22, 2014 14:24 IST2014-08-22T14:24:36+5:302014-08-22T14:24:36+5:30

स्वित्झर्लंडमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये परदेशातून आलेल्या ६११ जणांनी इच्छामरण स्वीकारल्याची माहिती समोर आली असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे.

Increasing Suicide Tourism in Switzerland | स्वित्झर्लंडमध्ये वाढतंय सुसाईड टुरिझम

स्वित्झर्लंडमध्ये वाढतंय सुसाईड टुरिझम

ऑनलाइन लोकमत

बर्न (स्वित्झर्लंड) दि, २२ -  भारतात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही यावरील वाद ताजा असतानाच स्वित्झर्लंडमध्ये 'सुसाई़ड टुरिझम'चे प्रमाण दुप्पटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये परदेशातून आलेल्या ६११ जणांनी इच्छामरण स्वीकारल्याची माहिती समोर आली असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. 

जगभरातील अनेक देशांमध्ये इच्छामरणाला अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. स्वित्झर्लंडमध्ये मात्र इच्छामरणाला कायदेशीर परवानगी आहे. या देशातील चार संस्थांना परदेशी व्यक्तींना इच्छामरणात सहकार्य करण्याची परवानगी आहे. 'जर्नल ऑफ मेडिकल इथिक्स'मध्ये दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षात स्वित्झर्लंडमध्ये परदेशातून आलेल्या ६११ पर्यटकांनी इच्छामरण स्वीकारले आहे. इच्छामरण स्वीकारणारे हे २३ ते ९७ वर्ष या वयोगटातील होते. यामध्ये तब्बल ५८ % महिलांचा समावेश आहे. जगभरातील ३१ देशांमधील व्यक्ती इच्छारणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामध्ये जर्मनीतील २६८, युकेमधील १२६, फ्रान्समधील ६६, इटली ४४, अमेरिकेतील २१, ऑस्ट्रियातील १४, कॅनडातील १२, स्पेन आणि इस्त्रायलमधील प्रत्येकी आठ व्यक्तींचा समावेश आहे. २०११ मध्ये भारतातील एका व्यक्तीने स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण स्वीकारल्याचे पाहणीतून समोर आले आहे. यातील बहुतांश लोकांनी इच्छामरणासाठी सोडियम पेंटोबार्बिटलचा वापर केला होता. 
 

Web Title: Increasing Suicide Tourism in Switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.