या गावात बदलत जातो दगडांचा आकार, पाहा काय आहे त्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 19:53 IST2017-10-16T19:47:03+5:302017-10-16T19:53:55+5:30
रोमानियातील एका छोट्या गावात अशी उंचीने वाढत जाणारी दगडं आढळतात. म्हणूनच त्यांना जिवंत दगड असेही म्हणतात.

या गावात बदलत जातो दगडांचा आकार, पाहा काय आहे त्यामागचे कारण
दगडांची वाढ झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही ना! जर तुम्हाला कोणी सांगितलं की इतर सजीवांप्रमाणे दगडांचीही वाढ होते तर तुम्ही नक्कीच त्याला वेड्यात काढाल. पण रोमानियातील एका छोट्या गावात अशी उंचीने वाढत जाणारी दगडं आढळतात. म्हणूनच त्यांना जिवंत दगड असेही म्हणतात.
रोमानियातील होरेझू शहरापासून ८ किमीवर असलेल्या कोस्टेस्टी गावात हे दगड आढळतात. फार पूर्वीपासून येथे असे दगड आढळत असल्याचे येथील स्थानिक सांगतात. आपल्या माहितीप्रमाणे दगडांची वाढ होत नाही. कारण अर्थात ते निर्जिव असल्याने ते शक्य नाही. मात्र रोमानियातील हे दगड मात्र त्याला अपवाद आहेत.
या दगडांच्या अशा वाढीबद्दल अद्यापही कोणतेही ठोस वैज्ञानिक कारण सापडले नसून काही शास्त्रज्ञ सांगतात की, या दगडांमध्ये मिनरल सॉल्ट असल्याने त्यांचा पाण्याशी संपर्क आल्यास दगडांची वाढ होऊ शकते.’ मिनरल सॉल्टचा पाण्याशी संपर्क आल्यास ते पसरतात त्यामुळेच दगडांची वाढ होत असल्याचा भास होतो.
शिवाय येथील स्थानिकांचं असं निरिक्षण आहे की ,‘पावसाळ्यातच या दगडांची वाढ होत असते किंवा या दगडांचा पाणशी संपर्क आल्यास त्यांची रचना बदलत जाते. स्थानिकांचं निरिक्षण आणि शास्त्रज्ञांचा शोध एकाच ठिकाणी येऊन थांबत असला तरी या कारणांवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही.