शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय राहतात? नाव आणि आकडेवारी वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:03 IST

Interesting Facts : बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये भारतीय राहतात, पण कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

Interesting Facts :  इराणवर इस्त्राइल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पश्चिम एशियातील स्थिती फारच भयावह झाली आहे. अमेरिका आणि इस्त्राइलची कारवाई, त्याला उत्तर म्हणून इराणने खाडी देशांमध्येही हल्ले केले. अशात लाखो भारतीयांबाबत चिंता वाढली आहे. बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये भारतीय राहतात, पण कोणत्या मुस्लिम देशात सगळ्यात जास्त भारतीय हे आपण आज जाणून घेणार आहोत. 

कोणत्या मुस्लिम देशात जास्त भारतीय?

पश्चिम एशियातील ज्या देशांमध्ये तणाव वाढलाय, तिथे मोठ्या संख्येत भारतीय लोक काम करतात. आकडेवारीनुसार, सगळ्यात जास्त भारतीय मुस्लिम देश यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमीरातमध्ये राहतात. यूएईमध्ये भारतीयांची संख्या जवळपास ३८.९ लाख ते ४३ लाखांपेक्षा जास्त सांगितली जाते. ही आकडेवारी तेथील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

यूएईनंतर दुसरा नंबर येतो तो सौदी अरेबियाचा. इथे साधारण २६ लाख भारतीय राहतात. कन्स्ट्रक्शन, रिटेल, हेल्थकेअर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक काम करतात. 

खाडी भागातील इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. कुवेतमध्ये साधारण १० ते ११ लाख भारतीय राहतात. कतारमध्ये जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त भारतीय काम करतात. ओमानमध्ये भारतीयांची संख्या ६ ते १३ लाख सांगितली जाते. या सगळ्या देशांमध्ये भारतीय मुख्यपणे श्रमिक, इंजिनिअर, डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर, सेल्स स्टाफ आणि फायनान्स सेक्टरमध्ये काम करतात. 

यूएईला भारतीयांची पहिली पसंती का?

यूएईला भारतीय प्रवाशांचं सगळ्यात मोठं केंद्र मानलं जातं. दुबई आणि अबू धाबीसारख्या शहरात व्यापार आणि नोकरीचे मोठे हब आहेत. टॅक्स व्यवस्था इतर ठिकाणापेक्षा सोपी आहे आणि भारतीयांसाठी व्हिसा प्रक्रियाही स्पष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात इथे भारतीयांचा मोठा सहभाग आहे. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारो नवीन भारतीय इथे काम करण्यासाठी येतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीQatarकतारsaudi arabiaसौदी अरेबिया