शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सायकलवेड्या माणसांच्या अजब दुनियेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 09:08 IST

आत्ता शाळेत असणाऱ्या मुलांचे आजी-आजोबा तर तासिका भाड्याने पैसे देऊन सायकल आणल्याच्या कितीतरी आनंददायी आठवणी सांगतात. एकेकाळी  सायकल हे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे.

सायकल चालवणे हा अनेकांच्या बालपणीच्या आठवणींचा एक अविभाज्य भाग असतो. सायकल शिकताना कोण कुठे पडलं होतं, सायकल चालवता येऊ लागल्यावर मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपने शाळेत किंवा क्लासला जाणं या आठवणी सायकल चालवणाऱ्या सगळ्यांना असतात. आत्ता शाळेत जाणाऱ्या मुलांना वाढत्या रहदारीमुळे पालक रस्त्यावर सायकल द्यायला नाखूश असतात. मात्र त्यांच्या पालकांकडे लहानपणी स्वतःची किंवा भावा-बहिणीची सायकल चालवल्याच्या खूप आठवणी असतात. 

आत्ता शाळेत असणाऱ्या मुलांचे आजी-आजोबा तर तासिका भाड्याने पैसे देऊन सायकल आणल्याच्या कितीतरी आनंददायी आठवणी सांगतात. एकेकाळी  सायकल हे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. नंतर मात्र ते गरिबांचं वाहन झालं. दुचाक्या आल्या तसं सायकलचं ग्लॅमर गेलं. आता काळ बदलला. सायकल चालवणं फिटनेस आणि पर्यावरण प्रेमाचं, पॅशनचं प्रतीक होऊ लागलं आहे. जगभर सायकलींचे अनेक प्रकारही उपलब्ध आहेत; इतकं की, सायकलच्या चाकांनी इतका वेग कधी घेतला याचंच आश्चर्य वाटावं.

भारतातल्याच सहारनपूर येथे राहणाऱ्या दीपेश तोमरने जगातली सगळ्यात उंच सायकल बनवली आहे. या सायकलची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. ही सायकल एकूण २६ फूट उंच आहे. तिचं सीट जमिनीपासून २२ फूट उंचीवर आहे. या सीटपर्यंत पोहचण्यासाठी त्या सायकलच्या शिडीचा वापर करावा लागतो. तिचं वजन आहे ९० किलो. आता या सायकलची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड‌मध्ये व्हावी म्हणून दीपेश प्रयत्न करतो आहे. पण असे उद्योग करणारा दीपेश काही पहिलाच नव्हे.

जगातली सगळ्यात जड/वजनदार सायकल बनवण्याचा मान वॉटर व्हॅन द बॉश नावाच्या माणसाला मिळाला आहे. त्याने या सायकलसाठी ट्रॅक्टरपेक्षा मोठं चाक वापरलं आहे. या सायकलचं वजन तब्बल ७५९ किलो इतकं आहे. मात्र असं असूनदेखील ही सायकल चालू शकते. या सायकलमुळे वॉटर व्हॅन द बॉश याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड‌मध्ये नोंदवलं गेलं आहे. जगभरात उंच झाली, जड झाली तशी जगातली सर्वाधिक लांब सायकलही आहेच. या सायकलची लांबी तब्बल ११७ फूट आहे. सामान्यतः मोठ्या माणसांची रोजच्या वापरातली सायकल सुमारे सहा फूट लांब असते, हे लक्षात घेतलं म्हणजे ११७ फूट लांब सायकल डोळ्यासमोर येऊ शकते. 

या सायकलला मागची चाकंच नाहीत. त्याऐवजी तिला मागे कोळ्यासारखे पाय जोडलेले आहेत. ही सायकल फक्त संपूर्णतः सपाट आणि गुळगुळीत रस्त्यावरच चालू शकते. मात्र या झाल्या जमिनीवरच्या सायकली. आता तर हवेत उडणारी सायकलदेखील एका व्यक्तीने बनवली आहे. ही सायकल जमिनीवर चालवता येऊ शकते तशीच पॅराशूटच्या मदतीने हवेतदेखील नेता येऊ शकते.हे झाले सगळे हौशी मामले. रोज वापरायला ते तसे फार कामाचे नाही.  मात्र जगातली सगळ्यात वेगवान सायकल मात्र खरोखर  वापरता येऊ शकते.

जपानच्या फुकुओका शहरातल्या काही विद्यार्थ्यांनी कॉम्प्रेस्ड हवेवर चालणारी ही सायकल तयार केली आहे. या सायकलचा वेग ६४ किलोमीटर्स प्रतितास इतका असू शकतो. याही सायकलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड‌मध्ये नोंद करण्यात आलेली आहे. रस्त्यावरच नाही तर बर्फावर चालणारी सायकल स्वीडनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मायकल गेल्मान याने बनवली आहे. ही सायकल पेडल मारल्यावर बर्फाळ रस्त्यावरदेखील चालू शकते. तिला समोर एलईडी दिवे आहेत, तर हाताने फिरवण्यासारखा वायपरदेखील आहे. संपूर्णतः वॉटरप्रूफ असणाऱ्या या सायकलचं वजन केवळ ७० किलो आहे. तशी २५ किलोमीटर इतक्या वेगाने जाऊ शकणाऱ्या या सायकलचं नाव मायकलने पॉडराईड असं ठेवलं आहे. अशा या जगभरातल्या सायकली. त्यांचे दीवाने जगभर काही कमी नाहीत.

सायकल येत नसली तरी ‘चालेल!’जगात सगळ्याच माणसांना काही सायकल चालवता येत नाही; पण सायकल चालवता येत नसेल तरी सायकल चालवायची असेल तर? त्यांच्यासाठीही आहे वॉकिंग सायकल. लहान मुलांच्या पायाने ढकलायचा खेळण्यातल्या स्कूटरचाच हा मोठा अवतार आहे. यात पेडल मारण्याच्या ऐवजी पायाने ढकलून सायकल पुढे न्यायची असते आणि त्यावर उभं राहायला जागा असते. त्यामुळे सायकल येत नाही म्हणून उदास व्हायचंही कारण नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके