चक्क लग्नात पडला १००-५०० च्या नोटांचा पाऊस; रस्त्यावर उडाली लोकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 10:35 IST2023-02-20T10:34:47+5:302023-02-20T10:35:02+5:30
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे

चक्क लग्नात पडला १००-५०० च्या नोटांचा पाऊस; रस्त्यावर उडाली लोकांची झुंबड
मेहसाणा - गुजरातमधील अंगोल या गावी माजी सरपंच करीम यादव यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नात वरातीवर १००, ५०० रुपयांच्या अनेक नोटांची बरसात केली. त्यावेळी या नोटा गोळा करण्यासाठी रस्त्यावर लोकांची झुंबड उडाली. अधिकाधिक नोटा मिळविण्याच्या नादात लोकांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. करीम यादव आपल्या घराच्या गच्चीवर उभे राहून पुतण्या रज्जाक याच्या वरातीवर नोटांची बरसात करताना व्हिडीओत दिसत आहेत. त्यावेळी लाउडस्पीकरवर जोधा-अकबर चित्रपटातील ‘अजीमो-शान शहनशाह’ हे गाणे वाजविण्यात येत होते. जेसीबीमध्ये बसविण्यात आलेल्या रज्जाकची वरात लग्नमंडपात आली तेव्हा सर्वांनी त्याचे जंगी स्वागत केले.