स्नेक आयलँड...एक असं बेट जिथं फक्त सापांचं राज्य, प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:52 IST2022-11-28T15:51:53+5:302022-11-28T15:52:45+5:30
स्नेक आयलँड ब्राझीलच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या बेटावर प्रत्येक पावला पावलावर साप दिसतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

स्नेक आयलँड...एक असं बेट जिथं फक्त सापांचं राज्य, प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती!
स्नेक आयलँड ब्राझीलच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या बेटावर प्रत्येक पावला पावलावर साप दिसतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगातील सर्वात विषारी साप जर कुठे असतील तर ते याच बेटावर आहेत. पृथ्वीवरील ही एकमेव अशी जागा आहे जिथं तुम्हाला गोल्डन लैंसहेड साप दिसेल. सापाची ही प्रजाती इतकी विषारी आहे की या बेटावरील मनुष्यवस्तीलाच यापासून दूर जावं लागलं आहे.
स्नेक आयलँडचं खरं नाव इल्हा दा क्यूइमाडा ग्रँड (Ilha da Queimada Grande) असं आहे. हे बेट साओ पावलोपासून केवळ ९० किमी अंतरावर आहे. या बेटावर लोक जाऊ शकत नाहीत. तिथं कुणाला जाऊ द्यायचं याचा निर्णय केवळ ब्राझीलचं नौदल देऊ शकतं. या बेटावर जाताना स्व:च्या सुरक्षेसोबतच बेटावरील सापांचीही सुरक्षा सरकारला घ्यावी लागते. त्यामुळे नौदलातील काही अधिकारी आणि वैज्ञानिकच अभ्यासाठी या बेटावर जाऊ शकतात.
जगातील सर्वात विषारी साप
जगातील सर्वात विषारी साप या बेटावर आढळत असल्यानंच बेटाला स्नेक आयलँड म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी गोल्डन लैंसहेट आणि ब्रोथ्रोप्स इन्सुलारिससारखे विषारी साप आढळतात. हे एका विषारी जातीच्या सापाचे प्रकार आहेत. जे २० इंचापेक्षा मोठे असतात. एक दंश केला की काही क्षणात खेळ खल्लास इतकी विषारी ताकद या सापांच्या दंशात असते. या बेटावर तुम्ही गेलात आणि तुम्हाला साप दिसले नाहीत असं कधीच होऊ शकत नाही. इतं प्रत्येक एका वर्गमीटर क्षेत्रामागे पाच साप आहेत. इथं विषारी सापांची संख्या इतकी आहे की या बेटावर पक्षीही येण्यास धजावतात. पण आपल्या प्रवासमार्गात थकल्यानं आराम करण्यासाठी पक्ष्यांना या बेटावर थांबावं लागतं. मनुष्यवस्ती फारशी या बेटावर उपलब्ध नाही. पक्ष्यांनाच लक्ष्य करुन येथील विषारी साप आपली व्यवस्था करतात.