तुम्ही ‘या’ सवयी लावा, कुणीच इग्नोर करणार नाही; लोक तुम्हाला कायम सीरियसली घेतील, पण कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:08 IST2025-10-19T10:07:33+5:302025-10-19T10:08:25+5:30
प्रोफेशनल होण्यासाठी नेहमीच मोठं पद, भारी डिग्री किंवा वर्षानुवर्षांचा अनुभव लागतो असं नाही.

तुम्ही ‘या’ सवयी लावा, कुणीच इग्नोर करणार नाही; लोक तुम्हाला कायम सीरियसली घेतील, पण कसं?
प्रोफेशनल होण्यासाठी नेहमीच मोठं पद, भारी डिग्री किंवा वर्षानुवर्षांचा अनुभव लागतो असं नाही. खरं तर, लोक तुम्हाला किती सीरियसली घेतात हे तुमच्या दैनंदिन छोट्या सवयींवर ठरतं.
- वेळेवर पोहोचणं : वेळेत पोहोचणं म्हणजे फक्त घड्याळ पाळणं नाही, तर तुम्ही इतरांचा वेळ महत्त्वाचा मानता, त्यांचा आदर करता आणि कामाची सुरुवात योग्य पद्धतीने करण्याची शिस्त अंगीकारली आहे, हे दाखवणं आहे.
- लवकर उत्तर देणे : आलेल्या मेसेजेसनला वेळेवर उत्तर देणं म्हणजे संवादात स्पष्टता ठेवणं, गैरसमज टाळणं आणि "मी याकडे लक्ष दिलं आहे" असा विश्वास समोरच्याला देणं होय. अगदी छोटंसं उत्तरही मोठा फरक घडवू शकतं.
- दिलेलं वचन पाळणे : कामाच्या ठिकाणी सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास, आणि तो विश्वास निर्माण होतो ते दिलेलं वचन पाळण्याने. तुम्ही सांगितलेलं काम वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण केल्यावर लोक तुमच्याकडे खात्रीने पाहतात.
- काम वेळेत पूर्ण करणे : डेडलाइन पाळणं म्हणजे केवळ स्वतःचं काम संपवणं नाही, तर संपूर्ण टीमचं काम सुरळीत चालेल याची जबाबदारी उचलणं आहे. वेळेत केलेलं काम टीमला गती देतं आणि तुमची विश्वासार्हता वाढवतं.
- नीट ऐकणे आणि मध्ये न बोलणे : समोरच्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणं ही एक मोठी ताकद आहे. यातून तुमचा संयम, आदर आणि समजूतदारपणा दिसून येतो. मध्ये तोडून बोलणं सहयोग कमी करतं, तर नीट ऐकणं टीमला एकत्र बांधतं.
- चूक मान्य करणे : चूक झाली तर ती लपवण्यापेक्षा लगेच कबूल करणं, ही खरे प्रामाणिकपणाचे चिन्ह आहे. यातून दिसतं की तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात. अशा वृत्तीमुळे तुमचा आदर वाढतो आणि विश्वास दुप्पट होतो.
- इतरांचं कौतुक करणे : टीममध्ये प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतं. इतरांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणं, आत्मविश्वास वाढवणं आणि टीमची ताकद अनेक पटींनी वाढवणं. यातून खरं नेतृत्व दिसतं.
- गॉसिप टाळणे : गॉसिप करणं म्हणजे वेळ वाया घालवणं आणि विश्वास तोडणं. कामाच्या ठिकाणी गॉसिप टाळणं म्हणजे स्वतःला विश्वासार्ह सिद्ध करणं, इतरांचा आदर राखणं आणि सकारात्मक वातावरण तयार करणं.