शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

दोन मुलांच्या आईचं 3 मुलांच्या वडिलांसोबत होतं अफेअर, पतीने मंदिरात लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 09:43 IST

जेव्हा महिलेच्या पतीला हे माहीत पडलं तेव्हा त्याने दोघांचं मंदिरात जबरदस्ती लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

बिहारच्या नवादा जिल्ह्यात एका विवाहित महिलेचं अफेअर सुरू होतं. महिलेचा प्रियकर तिच्या घरी लपून तिला भेटायला आला होता तेव्हा तो पकडला गेला. त्यानंतर त्याला पकडून मारहाण करण्यात आली आणि त्याला डांबून ठेवण्यात आलं. जेव्हा महिलेच्या पतीला हे माहीत पडलं तेव्हा त्याने दोघांचं मंदिरात जबरदस्ती लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस म्हणाले की, या घटनेची कुणीही तक्रार दाखल केली नाही.

ही घटना कहुआरा गावातील आहे. इथे एक तरूण रात्री उशीरा कामासाठी बाहेर गेला तेव्हा त्याच्या पत्नीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी आला. कुटुंबियांनी दोघांना पकडलं आणि मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही बांधून ठेवण्यात आलं. जेव्हा महिलेच्या पतीला समजलं तेव्हा तो भडकला. त्याने घरी आल्यावर दोघांनाही मंदिरात नेलं आणि त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं. 

पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावण्यात आलं तेव्हा आजूबाजूचे लोकही जमा झाले होते. लोकांसमोरच प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर दोघांनाही गावातील लोकांनी त्यांना गावाबाहेर काढलं. यावर महिलेचा पती काहीच बोलला नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

महिलेचा प्रियकर नक्शेना गरहीया गावात राहणारा आहे. तो विवाहित आहे आणि तीन मुलांचा वडील आहे. तेच महिला कहूआरा गावात राहणारी आहे. तिलाही दोन मुलं आहेत. पोलीस म्हणाले की, अजून याबाबत कुणाचीही तक्रार आली नाही. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेmarriageलग्न