रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 20:19 IST2021-08-22T20:17:54+5:302021-08-22T20:19:10+5:30
Viral Video:लाखो लोकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिला आहे.

रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. यात विशेषतः प्राण्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटात दाखवण्यात येतो, तसा महाकाय अॅनाकोंडा चक्क रस्त्याने फिरताना दिसत आहे.
आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहिला आहे. व्हिडिओमध्ये एक महाकाय अॅनाकोंडा रस्ता ओलांडताना दिसत आहे. तर, या सापाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही जमलेली यात दिसतीये. या सापला रस्ता ओलांडत इजा होऊ नये, यासाठी रस्त्यावरील ट्रॅफिक थांबवण्यात आलीये. तसेच, काही लोक या सापाचा व्हिडिओ बनवतानाही यात दिसत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण या व्हिडिओवर विविध कमेंट्स करत आहेत. या महाकाय सापाला पाहून अनेकांना धक्का बसलाय, तर काही लोक त्या सापाला सावधगिरीने रस्ता ओलांडण्यास मदत करण्याचे कौतुक करत आहेत.