शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रोज किती लीटर पेट्रोल जाळतात भारतीय लोक? डिझेलची आकडेवारी बघाल तर बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:02 IST

Petrol - Diesel Use In India : सरकारची एजन्सी PPAC आणि उद्योगासंबंधी आकडेवारीनुसार, भारतात रोज कोट्यावधी लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो.

Petrol - Diesel Use In India : इराण विरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाची जगभरात चर्चा सुरू आहे. आशियातील काही देशांना तेलाचा आणि गॅसचा तुटवडा जाणवत आहे. भारतातही याचा काही प्रमाणात प्रभाव बघायला मिळतोय. आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण भारत हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा तेल वापरकर्ता देश आहे. पण देशात रोज किती लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला अचंबित करणारं असेल. सरकारची एजन्सी PPAC आणि उद्योगासंबंधी आकडेवारीनुसार, भारतात रोज कोट्यावधी लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो.

रोज किती पेट्रोल जळतं? 

भारतात वर्षाला साधारण ४७५० कोटी लीटर पेट्रोल खर्च केलं जातं. याचा अर्थ देशात दररोज साधारण १३ कोटी लीटर पेट्रोल वापरलं जातं. पेट्रोल मुख्यपणे टू-व्हीलर, कार आणि छोट्या वाहनांसाठी वापरलं जातं.

डिझेल किती जाळलं जातं? 

आपल्याला कल्पना नसेल की, देशात पेट्रोलपेक्षा डिझेल वापरलं जातं. भारतात वर्षाला साधारण १०,७०० कोटी लीटर डिझेल जाळलं जातं. म्हणजे यानुसार बघायला गेलं तर दररोज साधारण २९ ते ३० कोटी लीटर डिझेल वापरलं जातं. हा आकडा पेट्रोलच्या तुलनेत दुप्पटपेक्षाही जास्त आहे.

भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण पेट्रोलिअम उत्पादनांमध्ये साधारण ४० टक्के भाग डिझेलचा आहे. त्यानंतर पेट्रोलचा भाग साधारण १६ टक्क्यांच्या आसपास आहे. वाहनांच्या उपयोगाच्या आधारावर भारतात रोज साधारण ९५ कोटी लीटर पेट्रोल - डिझेल आणि इतर वाहनांचं इंधन जाळलं जातं. 

दरवर्षी वाढतेय मागणी

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पेट्रोलची मागणी खूप जास्त वाढली आहे. २०२२ - २३ मध्ये पेट्रोलचा वापर ३४.९८ मिलियन टनांपर्यंत पोहोचला आहे. जो एका वर्षात १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दाखवतो. 

भारतात सरासरी एक व्यक्ती दर महिन्याला साधारण ९ लीटर पेट्रोल - डिझेलचा वापर करतो. यात जवळपास २.८ लीटर पेट्रोल आणि ६.३ लीटर डिझेलचा समावेश आहे. म्हणजे प्रति व्यक्ती वर्षाला साधारण १०९ लीटर इंधन खर्च करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : India Burns Billions of Liters of Petrol and Diesel Daily

Web Summary : India consumes approximately 13 crore liters of petrol and 29-30 crore liters of diesel daily. Diesel accounts for 40% of petroleum product use, with petrol at 16%. Overall fuel demand is rising, with petrol consumption up 13% last year.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सPetrolपेट्रोलDieselडिझेल