ऐकावं ते नवलच! चक्क रुग्णालयातील रुग्णवाहिका चोरून पळाला रुग्ण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:55 IST2024-02-21T15:32:31+5:302024-02-21T15:55:45+5:30

रुग्णालयात दाखल असलेला एक रुग्ण सध्या फरार आहे. तो उपचारादरम्यानच रुग्णालयामधून बाहेर आला आणि रुग्णवाहिका चोरून पळून गेला.

hospital patient steals ambulance in medical gown during treatment in us | ऐकावं ते नवलच! चक्क रुग्णालयातील रुग्णवाहिका चोरून पळाला रुग्ण अन्...

प्रातिनिधिक फोटो

रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेला एक रुग्ण सध्या फरार आहे. तो उपचारादरम्यानच रुग्णालयामधून बाहेर आला आणि रुग्णवाहिका चोरून पळून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी घडली. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, इनोव्हा फेयफॅक्स रुग्णालयाच्या बाहेर रात्री 9.30 वाजता ही घटना घडली. फरार आरोपीवर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. फेयफॅक्स काउंटी पोलीस विभागाने रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमधून संशयिताचा फोटो शेअर केला आणि म्हटलं, या रुग्णाला अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. त्याच्या हाताला आयव्ही होता. उपचार चालू होते. 

रुग्णाने एक खासगी रुग्णवाहिकेची चोरी केली. आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याची ओळख 32 वर्षीय रिकी लेवी अशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ज्या वाहनातून जात होता. त्याचा अपघात झाला होता. अपघातानंतर अधिकाऱ्यांना वाहनाच्या आतून दोन बंदुका आणि ड्रग व इतर साहित्य जप्त केलं आहे. 

सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. रात्री साडेअकरा वाजता तो प्रिन्स विल्यम काउंटीमध्ये दिसला. आता शोधकार्य वेगाने करण्यात आले आहे. यासाठी फेयफॅक्स पोलीस विभागाचे हेलिकॉप्टरही वापरले जात आहे. पोलिसांनीही लोकांना याबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: hospital patient steals ambulance in medical gown during treatment in us