कारवर पडून घोडा असा काही अडकला, बघा कशी केली त्याची सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:55 AM2020-01-06T11:55:26+5:302020-01-06T12:14:27+5:30

एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घटनेत एक घोडा वरून कारवर पडला आणि कारच्या समोरच्या भागात अडकला.

Horse injured struggles escape wrecked car smashing windscreen pics are horrifying | कारवर पडून घोडा असा काही अडकला, बघा कशी केली त्याची सुटका!

कारवर पडून घोडा असा काही अडकला, बघा कशी केली त्याची सुटका!

Next

एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घटनेत एक घोडा वरून कारवर पडला आणि कारच्या समोरच्या भागात अडकला. ही धक्कादायक घटना Guaynabo, Puerto Rico येथे घडली. या घटनेचे फोटो काहींना विचलित करू शकतात.

ही घटना कशी घडली याची स्पष्ट माहिती अजून समोर आली नाही. पण फोटो तुम्ही बघू शकता की, घोड्याचे समोरचे दोन्ही पाय कारचा समोरचा काच तोडून आत फसले आहेत. 

बराच वेळ हा घोडा कारमध्ये असाच अडकला होत. त्याला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशात Daewoo Lanos या कारचं छत कापून घोड्याची सुटका करण्यात आली.

या घोड्याचं नाव Ranchero असून तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या ड्रायव्हरला कोणतीही इजा झाली नाही. सध्या घोड्याच्या उपचारासाठी एक कॅम्पेन चालवलं जात आहे. ज्या माध्यमातून त्याच्या उपचारासाठी पैशांची मदत होईल. 


Web Title: Horse injured struggles escape wrecked car smashing windscreen pics are horrifying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.