एलिअन्स पृथ्वीवर येत असतील आणि..., वैज्ञानिक वैज्ञानिकाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:27 AM2024-04-15T09:27:08+5:302024-04-15T09:28:52+5:30

हैराण करणारी बाब म्हणजे असे दावे करणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांपासून ते पायलट आणि मोठ्या प्रोफेसर यांचाही समावेश आहे.

Harvard professor claims aliens probably visited earth using hidden dimension | एलिअन्स पृथ्वीवर येत असतील आणि..., वैज्ञानिक वैज्ञानिकाचा मोठा दावा

एलिअन्स पृथ्वीवर येत असतील आणि..., वैज्ञानिक वैज्ञानिकाचा मोठा दावा

एलिअन्सबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात.  संशोधक याबाबत सतत काहीना काही शोध करत असतात. यूएफओच्या माध्यमातून ते पृथ्वीवर येतात असाही दावा केला जातो. पण याचे ठोस असे काही पुरावे नाहीत. ब्रिटनमध्ये 2.5 वर्षाच्या आत साधारण 1 हजार यूएफओ बघण्यात आल्याचं बोललं जातं. हैराण करणारी बाब म्हणजे असे दावे करणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांपासून ते पायलट आणि मोठ्या प्रोफेसर यांचाही समावेश आहे. आता एक इस्त्राईल-अमेरिकन अभ्यासक एवी लोएब यांनी एक दावा केला आहे. 

एलिअन्सचं अस्तित्व सिद्ध करण्यामागे लागलेल्या एवी यांनी एलिअन हंटर असंही म्हणतात. त्यांनी एका माहितीपटात दावा केला आहे की, यूरोपीय संघटना CERN मध्ये बनवण्यात आलेल्या हिडन डायमेंशनच्या मदतीने एलिअन्स गुप्तपणे पृथ्वीवर आले असतील. 

फ्रान्स-स्वित्झर्लंड सीमेवर जिनेवामध्ये संघटनेचे वैज्ञानिक बिग बॅंगची स्थितीत पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करण्यात लार्ज हॅड्रॉन कोलाइडर जगातील सगळ्या मोठ्या आणि सगळ्यात शक्तिशाली पार्टिकल एक्सिलेटरचा वापर करत आहेत. या माध्यमातून हे समजण्याची आशा आहे की, आपलं ब्रह्मांड सगळ्यात आधी कसं बनलं.

'द पॅरानॉर्मल यूएफओ कनेक्शन' माहितीपटात प्रोफेसर लोएब यांनी सांगितलं की, एलिअन्स पृथ्वीपासून खूप दूर असू शकतात. ते म्हणाले की, असंही शक्य आहे की, ते आधीपासून अब्जो वर्षापासून डायमेंशन होपिंग टेक्नीकवर काम करत असतील. जर एलिअन्सची टेक्नीक आपल्याकडे पोहोचली तर आपण अवाक् होऊ कारण ही आपल्याकडे असलेल्या टेक्नीकच्या खूप पुढची असेल.

लोएब म्हणाले की, एलिअन गपचूप पृथ्वीव येत असतील आणि आपल्या सगळ्या टेक्नीक, उपकरणांना बघत असतील. ते म्हणाले की, मनुष्यांकडून हिडन डायमेंशनच्या माध्यमातून प्रवास केल्यास टक्कर होण्याची शक्यता वाढू शकते.

Web Title: Harvard professor claims aliens probably visited earth using hidden dimension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.