शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

#HappyBirthdayHrithik : ह्रितिकच्या 'या' डान्स स्टेप्सनी लावले चाहत्यांना अक्षरश: वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 12:52 IST

ह्रितिक रोशन त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठी जगभर ओळखला जातो. प्रत्येक सिनेमात त्याने आपल्याला त्याच्या डान्समुळे वेड लावलं होतं.

ठळक मुद्देबॉलिवूडचा ग्रीक गॉड ह्रितिक रोशन आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करतोय. अभिनय, अॅक्शन, रोमान्स यासोबतच तो ओळखला जातो ते म्हणजे त्याच्या नृत्यकौशल्यासाठी.त्याच्या सगळ्या चित्रपटांपासून अवॉर्ड शो मधल्या सगळ्या परफॉर्मन्समधून त्याचं नृत्यकौशल्य आपण पाहत आलोय.

मुंबई : बॉलिवूडचा ग्रीक गॉड ह्रितिक रोशन आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच त्याच्या अभिनयासोबत त्याच्या कमालीच्या नृत्यकौशल्याचं कौतुक झालं. सर्वच सिनेमात त्याने आपल्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यापैकी सर्वच गाण्यांचा उल्लेख इथे आपण करु शकत नाही, मात्र ही काही गाणी जी आपण विसरुच शकत नाही, अशी आहेत. पाहुयात त्याच्या काही डान्स स्टेप्स ज्या त्याच्या सिग्नेचर स्टेप्स झाल्या.

१) एक पल का जीना - कहो ना प्यार है

२००० साली आलेल्या या त्याच्या पहिल्या चित्रपटातच त्याचं नृत्य बघून सर्वांनीच आ वासले. कोरिओग्राफर फराह खानसह ह्रितिकलाही तेव्हा या नृत्यासाठी अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. ९०च्या दशकातल्या प्रत्येकाने या गाण्यावर नक्कीच कुठे ना कुठे डान्स केलाच असणार. अजूनही टनानना टनानना ही म्युझिक वाजताच एक हात पुढे जाऊन एक हात कमरेकडे येऊन आपण आपोआप नाचु लागतो. याला म्हणतात डान्सचा एक स्टॅंडर्ड सेट करणं.

२) बावरे - लक बाय चान्स

२००९मध्ये आलेल्या झोया अख्तरच्या लक बाय चान्स या चित्रपटात ह्रितिकने एका चित्रपटसृष्टीतल्या स्ट्रगलरची भूमिका केली आहे. त्या चित्रपटातील बावरे या लोकनृत्यसदृश गाण्यावरील त्याचा डान्स सर्वांनाच अवाक् करुन गेला.

३) यु आर माय सोनिया - कभी खुशी कभी गम

२००३ साली आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर गल्ला जमवलाच सोबत क्रिटीक्सचं कौतुकही मिळवलं. मल्टी स्टारर चित्रपटात परदेशातील पबमध्ये चित्रीत केलेल्या या गाण्यात ह्रितिकसोबत करीना कपूरनेही आपलं नृत्यकौशल्य दाखवलं. त्याच्या सिग्नेचर स्टेप्स आजही ९०च्या दशकातल्या मुलांना माहीत आहेत आणि लक्षात आहेत.

४) मैं ऐसा क्यों हूँ - लक्ष्य

२००४मध्ये आलेल्या या चित्रपटात ह्रितिकने एका रिकामटेकड्या मुलाचा एक आर्मी ऑफीसर होतानाची भूमिका बजावली आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातील या गाण्यात ह्रितिकने जादुई नृत्य केलं आहे. आपण ते फक्त पाहत राहतो, पाहत राहतो आणि पाहत राहतो.

५) धुम अगेन - धुम २

धुम सीरिजमधला धुम २ हा चित्रपट २००६ साली चित्रपटगृहात आला. शामक दावर या झाज आणि वेस्टर्न स्टाईल डान्स कोरिओग्राफरने ह्रितिकवर अतिशय सुंदररित्या हे गाणं दिग्दर्शित केलं. या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी शामक दावरसह ह्रितिकचंही फार कौतुक आणि सन्मान झालं.

टॅग्स :Hrithik Roshanहृतिक रोशनAmisha Patelअमिषा पटेलbollywoodबॉलीवूडSonam Kapoorसोनम कपूरKatrina Kaifकतरिना कैफ