गये थे हनिमून, पहूंचे जेल

By Admin | Updated: May 28, 2017 04:17 IST2017-05-28T04:17:57+5:302017-05-28T04:17:57+5:30

कधी कधी आमच्या हातून नकळत चूक घडते आणि त्याची अशी काही शिक्षा भोगावी लागते की, ती जन्मभर विसरता येत नाही. असेच काही येथील नवविवाहित जोडप्यासोब

Had gone honeymoon, prisons jail | गये थे हनिमून, पहूंचे जेल

गये थे हनिमून, पहूंचे जेल

नवी दिल्ली : कधी कधी आमच्या हातून नकळत चूक घडते आणि त्याची अशी काही शिक्षा भोगावी लागते की, ती जन्मभर विसरता येत नाही. असेच काही येथील नवविवाहित जोडप्यासोबत झाले. दिल्लीतील रहिवासी नीरज ठाकूर हनिमूनला चालले होते; परंतु प्रवासात त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यामुळे दोघांना हनिमूनऐवजी तुरुंगात जावे लागले. हे दाम्पत्य हनिमूनला जाण्यासाठी रेल्वेस्टेशनवर आले होते, तेव्हा त्यांनी आपली समजून दुसऱ्याची बॅग उचलली आणि रेल्वेत चढू लागले. त्याचवेळी बॅग मालकाला बॅग गायब असल्याचे आढळले. तो लगेच पोलिसांना घेऊन आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर बॅग कोणी घेतली हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नीरज आणि त्याच्या पत्नीला रेल्वेतून खाली उतरवून चौकशीसाठी ठाण्यात नेले. ‘एक महिन्यापूर्वीच माझे लग्न झाले. मी हनिमूनसाठी उटीला चाललो होतो. स्टेशनवर चुकून मी दुसऱ्याची बॅग उचलली’, असे नीरजने पोलिसांना चौकशीत सांगितले; मात्र तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दाम्पत्याला न्यायाधीशांसमोर हजर केले. न्यायाधीशांनी दोघांची रवानगी कारागृहात केली.

Web Title: Had gone honeymoon, prisons jail