Weird News : लग्नात घडणाऱ्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. यातील काही घटना इतक्या खतरनाक असतात की, त्यांवर विश्वासही बसत नाही. तर काही घटना चक्रावून टाकतात. कधी नवरी पळून जाते तर कधी नवरदेव. मात्र, उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात नेहमीच्या घटनांपेक्षा एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे लग्नावेळ नवरदेव बदलल्याची घटना घडली आहे. झज्जर जिल्ह्यातील झुजनू गावात आलेल्या वरातीचं स्वागत जोरात सुरू होतं. तेव्हा कुणालातरी नवरदेव बदलल्याचा संशय आला. पाहुण्यांची चौकशी केली गेली तर शंका खरी ठरली.
न्यूज १८ डॉट कॉम हिंदीच्या वृत्तानुसार, लग्नावेळी नवरदेव बदलण्यात आल्याची ही अजब घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या सुनील कुमारनं त्याच्या बहिणीचं लग्न पानीपतमधील मुलासोबत ठरवलं होतं. मंगळवारी रात्री वरात आली होती. तेव्हा दिसलं की, मध्यस्थी करणारे लोक तेच होते, पण नवरदेव मात्र बदलला होता. आधी दाखवलेला मुलगा वेगळा होता.
उसकी टोपी इसके सर...
काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच मुलीच्या कुटुंबियांनी शंका व्यक्त केली. काही वेळातच नवरदेवाबाबत भांडाफोड झाला. मुलीनं जो मुलगा बिघतला होता, तो साधारण २० ते २५ वर्षांचा होता. तो पानीपतचा राहणारा होता. तर वरात घेऊन आलेल्या नवरदेवाचं वय ४० च्या आसपास होतं आणि तो झज्जरचा राहणारा होता.
कसा झाला गोलमाल?
मुलीकडील लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर काही वेळातच सगळा गोलमाल समोर आला. वरातीसोबत आलेल्या मध्यस्थी लोकांनी सांगितलं की, जो मुलगा दाखवण्यात आला होता, त्याचा पाय मोडला. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला नवरदेव बनवून आणण्यात आलं.
नवरदेव बदलला
मुलीच्या भावानं सांगितलं की, लग्न ठरवत असताना जो मुलगा दाखवण्यात आला होता, तो मुलगा वरातीसोबत आला नाही. त्याच्याजागी दुसऱ्या व्यक्तीला नवरदेव बनवून आणण्यात आलं. त्यामुळे हे लग्न मोडण्यात आलं. मध्यस्थी असलेली व्यक्ती योग्य ती माहिती देत नाहीये. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.