शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चपाती उशीरा मिळाल्यानं भडकला नवरदेव, मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणीशी केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:32 IST

येथील एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला.

लग्नासंबंधी अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी एखाद्या लग्नात जेवण कमी पडतं, तर कधी नवरदेव किंवा नवरी पळून जातात. इतकंच नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरूनही लग्न मोडलं जातं. उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथील एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला.

मुगलसरायमधील एका लग्नात नवरदेवाकडील पाहुण्यांना जेवण देण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे नवरदेव आणि त्याचे नातेवाईक नाराज झाले. हा वाद इतका वाढला की, नवरदेव लग्नातून फरार झाला. नवरी नवरदेवाची वाट बघत बसली. 

मीडिया रिपोर्टनुसार, सात महिन्यांआधी नवरीच्या गावातीलच मेहताब नावाच्या तरूणासोबत लग्न ठरकलं होतं. २२ डिसेंबरला जल्लोषात लग्न सुरू होतं. नवरीकडील लोकांनी पाहुण्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर पाहुण्यांना जेवण देण्यात आलं. तेव्हाच एका पाहुण्याने जेवताना चपाती देण्यास उशीर झाल्याचं सांगत बडबड सुरू केली.

या गोष्टीवरून नवरदेवाकडील लोक नाराज झाले. वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला. पण नवरदेवाकडील लोकांनी वरात परत नेण्याचा निर्णय घेतला. नवरीच्या घरातील आनंदावर पाणी फेरलं गेलं. इतकंच नाही तर काही तासांनंतर तरूणाचं लग्न त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीसोबत लावून देण्यात आलं. नवरीकडील लोकांना हे समजताच त्यांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही.

लग्नात ७ लाख रूपयांचं नुकसान

तक्रारीत सांगण्यात आलं की, २०० पाहुणे त्यांच्या घरी आले होते. पाहुण्यांचं रितीरिवाजानुसार स्वागत करण्यात आलं आणि निकाहची तयारी झाली होती. तेव्हाच नवरदेवाकडील लोक जेवण उशीरा मिळाल्यानं रागावले. त्यानंतर ते वरात परत घेऊन गेले. नवरीनं हेही सांगितलं की, दीड लाख रूपये हुंडा मुलाच्या घरी पाठवण्यात आला होता. लग्नात जवळपास ७ लाख रूपयांचं नुकसान झालं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न