शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:27 IST

Bride Groom Jaimala Ceremony : नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं.

Bride Groom Jaimala Ceremony : जेव्हाही कुणाचं लग्न  ठरतं तेव्हा नातेवाईकांना लग्नात बोलवलं जातं. नवरदेव आपल्या खास मित्रांना लग्नात बोलवतो. पण जर याच मित्रामुळे लग्न मोडलं किंवा नवरीने लग्न करण्यास नकार दिला तर? बिहारच्या आरा जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाचं आयोजन धडाक्यात आणि आनंदाने केलं जात होतं. नवरदेव सुद्धा वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला होता. इंडिया टुडे न्यूजनुसार, एका लॉनमध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 मार्चला रात्री 11 वाजता वरात आली. नवरी-नवरदेव स्टेजवर पोहोचले.

यावेळी इथे जे झालं त्यामुळेच हे लग्न मोडलं. नवरदेवाचा एक मित्र स्टेजवर पोहोचला आणि नवरीचा हात पकडून स्टेजवर डान्स करू लागला.नवरीला डान्स करण्यासाठी फोर्स केला. नवरीला हे अजिबात आवडलं नाही आणि या गोष्टीमुळे निराश होऊन नवरीने लगेच लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये वाद पेटला. वाद इतका वाढला की, नवरीने लग्न करण्यास नकार दिला. 

कुटुंबियांनी नवरीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नवरदेवाला आपली वरात घेऊन माघारी जावं लागलं. आता दोन्ही परिवार पुन्हा एकत्र येऊन लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण अजून नवरी किंवा नवरदेवाकडून यावर काही सांगण्यात आलं नाही.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके