शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

लग्नाच्या दिवशीच झाला नवरदेवाचा मृत्यू, तरीही नवरीचं लावून दिलं लग्न; जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:20 IST

Groom Died On Marriage Day : जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुरूस्ती काम सुरू होतं. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तीन लोक गंभीर जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर नवरदेवाचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मॅनपुरी जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्या दिवशी नवरदेवाची वरात निघणार होती त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. काही दुरूस्ती करताना घरातील हॅंडपंपचा पाइप हायटेंशन ताराला लागला आणि शॉक लागल्याने तरूणाचा मृत्यू  (Groom Died On Marriage Day) झाला. या घटनेनंतर लग्न घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. असं सांगितलं जात आहे की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुरूस्ती काम सुरू होतं. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तीन लोक गंभीर जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर नवरदेवाचा मृत्यू झाला.

ही घटना मॅनपुरीच्या नगला मान गावात घडली. या गावातून २० एप्रिलला प्रमोद यादवचा मुलगा अनुराग यादवची वरात जाणार होती. वरातीची जोरात तयारी सुरू होती. नातेवाईक पाहुणे एकत्र आले होते. पण अचानक घडलेल्या या घटनेने सगळं चित्र बदललं. लग्न घरात दु:खाचं सावट पसरलं.

बुधवारी दुपारी अनुराग आपला भाऊ अनुज आणि नातेवाईकांसोबत हॅंडपंपची दुरूस्ती करत होता. लोखंडी पाइप बाहेर काढताना पाइप वरच्या हायटेंशन ताराला लागला. अशात शॉक लागून दोन भावांसह तीन लोक भाजले गेले. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण नवरदेवाचा मृत्यू झाला. 

दुसरीकडे नवरदेचा मृत्यू झाल्याचं समजताच नवरीच्या घरातही एकच गोंधळ उडाला. मुलीला कुणी दोष देऊ नये, नावं ठेवू नये याची चिंता तिच्या कुटुंबियांना होती. नवरीच्या कुटुंबियांनी लगेच दुसऱ्या तरूणाचा शोध घेणं सुरू केलं. त्याच परिसरातील एका गावातील एक परिवार आपल्या मुलाचं तरूणीसोबत लग्न लावण्यात तयार झाला. ज्यानंतर तरूणीचं ठरलेल्या वेळी लग्न लावून देण्यात आलं. रात्रीतूनच लग्नाचे सगळे रितीरिवाज पूर्ण करण्यात आले आणि सकाळी नवरीची पाठवणी करण्यात आली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नJara hatkeजरा हटके