शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:02 IST

गुगल ट्रान्सलेटरकडून भन्नाट भाषांतर

मुंबई: एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपण अनेकदा गुगलचा आधार घेतो. विशेष म्हणजे जगातील अनेक भाषांमधील शब्दांचे अर्थ गुगल ट्रान्सलेशन सांगू शकतं. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात गुगल ट्रान्सलेशनचा वापर करणाऱ्यांची प्रचंड आहे. मात्र सध्या गुगल ट्रान्सलेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. मुकेश अंबानी यांचं नाव माहीत नसलेली व्यक्ती सापडणं तसं अवघडच. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांसह जगाला अंबानी हे आडनाव माहीत आहे. धीरुभाई अंबानी यांनी अत्यंत कष्टानं रिलायन्सचं साम्राज्य उभं केलं. मात्र गुगल ट्रान्सलेटर पाहिल्यावर अंबानी या आडनावातच पैसा आहे की काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. यामागचं कारण म्हणजे अंबानी शब्द रोमानियनमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्यास गुगल ट्रान्सलेटर 'आय हॅव्ह मनी' (माझ्याकडे पैसा आहे) असं आऊटपूट मिळतं. 

अंबानी शब्दाचा पहिला स्क्रीनशॉट पहिल्यांदा रेडिटवर आला. त्यानंतर हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. फोर्ब्स मासिकानं दिलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात मुकेश अंबानींची संपत्ती 51.1 बिलियन डॉलर होती. भारतीय चलनात रुपांतर केल्यास ही रक्कम 36,12,10,05,00,000 रुपये इतकी होते. जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत ते १३ व्या स्थानी आहेत. रिलायन्स समूहाची स्थापना करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचं 2002 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे दोन पुत्र मुकेश आणि अनिल यांच्यामध्ये संपत्तीची विभागणी झाली. यापैकी मुकेश यांचं उद्योग जगतातलं स्थान अतिशय मोठं आहे. तेल आणि वायू क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यावर २०१६ मध्ये मुकेश यांनी जिओची घोषणा केली. जिओनं अवघ्या काही दिवसांत दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवली.  

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीgoogleगुगलRelianceरिलायन्स