ही आहे जिराफ वूमेन

By Admin | Updated: March 29, 2017 01:34 IST2017-03-29T01:34:17+5:302017-03-29T01:34:17+5:30

सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेल्स येथील सिडनी

This is Giraffe Woman | ही आहे जिराफ वूमेन

ही आहे जिराफ वूमेन

लॉस एंजेल्स : सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेल्स येथील सिडनी स्मिथ (३०) या तरुणीने जिराफासारखी लांब मान दिसण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत. तिने आपली मान लांब करण्यासाठी मानेभोवती पितळाचे १५ कडे घातले आहेत. यामुळे तिची मान काही सेंमीने वाढली असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिने अलीकडच्या काळात बोलणेही कमी केले आहे. सामान्य व्यक्तींसारख्या हालचाली ती करू शकत नाही. पण, काय करणार तिला तिची मान जिराफासारखी करायची आहे. पाच वर्षांपासून ती गळ्यात कडे घेऊन वावरत आहे. जगात आपली ‘मान उंचावण्याची’ तिची इच्छा आहे.

Web Title: This is Giraffe Woman