बाबो! उद्यानात उमललं प्रचंड मोठं फूल, मृतदेहासारखा येतोय वास; पाहण्यासाठी तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:29 IST2021-11-03T13:28:38+5:302021-11-03T13:29:55+5:30
उद्यानात उमललेलं प्रचंड मोठं फूल पाहायला शेकडोंची गर्दी

बाबो! उद्यानात उमललं प्रचंड मोठं फूल, मृतदेहासारखा येतोय वास; पाहण्यासाठी तोबा गर्दी
कॅलिफॉर्निया: अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफॉर्नियात एक मोठं फूल उमललं आहे. हे भलंमोठं फूल पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमली आहे. इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये आढळून येणाऱ्या या फुलाला कॉर्पस प्लान्ट म्हटलं जातं. दक्षिण कॅलिफॉर्नियातील बॉटनिकल गार्डनमध्ये हे फूल उमललं आहे. रविवारी दुपारपासून हे फूल उमलण्याची प्रक्रिया सुरू झाली.
कॉर्पस प्लान्टला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळपर्यंत उद्यानाची सर्व तिकीटं विकली गेली. तब्बल ५ हजार जणांनी हे विचित्र फूल पाहिलं. मात्र अवघ्या ४८ तासांत फूल कोमजून गेलं. फूल पूर्ण उमलेलं असताना त्यातून अतिशय तीव्र स्वरुपाचा दुर्गंध येत होता.
बॉटिनिकल गार्डनमध्ये उमलेल्या विचित्र फुलातून येणारी दुर्गंधी एखाद्या मृतदेहातून येणाऱ्या वासासारखी होती, अशी माहिती उद्यानतज्ज्ञ जॉन कॉर्नर यांनी दिली. याआधी असंच फूल सुमात्रामध्ये उमललं होतं. ते फूल पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती. अनेकांनी विचित्र फूल ऑनलाईन पाहिलं. हे विचित्र फूल आता दुर्मीळ होऊ लागलं आहे.
या फूलाला शास्त्रीय भाषेत Amorphophallus titanum म्हटलं जातं. त्याची उंची १० फूटांपर्यंत असते. हे फूल इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावरच पाहायला मिळतं. सुमात्रातील जंगलं नाहिशी होत आहेत. जंगलांचा ऱ्हास होत असल्यानं फूल दुर्मीळ होत चाललं आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत.