जगभरात असे वेगवेगळे देश आहेत. जिथल्या परंपरा, राहणीमान आपण कधी विचारही केला नसेल असं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणच्या परंपरांबाबत सांगणार आहोत. आफ्रिकेतील पूर्व भागात अनेक देशांजवळ बेटं आहेत. त्यापैकीच एक असलेलं मादागास्करचं बेट तुम्हाला माहीत असेल. या ठिकाणी महिला, पुरूष आणि लहान मुलंसुद्धा एक सारखेच कपडे घालतात.
स्थानिक भाषेत या कपड्यांना लांम्बा असं म्हणतात. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा लांम्बा घातला जातो. शेकडो वर्षांपूर्वी हे बेट आफ्रिकेपासून वेगळं झालं होतं. या बेटाला सुरूवातीच्या काळात मालागासी असं म्हटलं जात होतं. या बेटावर राहत असलेल्या लोकांना याच नावाने ओळखलं जातं.
मादागास्कर बेटावर जवळपास ७५ स्थानिक जाती आहेत. या जातीचे लोक जगभरात इतरत्र कुठेही दिसून येत नाही. या बेटावर आकर्षक जीवजंतू सुद्धा असतात. ज्यात टेनरेक्स म्हणजेच काटे असलेले उंदीर, आणि चमकणारे किटक यांचा समावेश आहे.
मादागास्करला ग्रेट रेड द्वीप असं सुद्धा म्हटलं जातं. कारण इथली माती लाल असते. ही माती साधारणपणे कृषी व्यवसायासाठी वापरली जाते. मादागास्करमध्ये सगळ्यात आधी वास्तव्यास कोणं आलं याबाबतीत अनेक वाद विवाद आहेत.
काही तज्ञांच्यामते २००० वर्षांपूर्वी या ठिकाणी इंडोनेशियाचे लोक राहत होते. त्यावेळी या ठिकाणी आफ्रिकन लोक नव्हते. आफ्रिकन लोक या ठिकाणी इंडोनेशियन लोकांच्यानंतर आल्याचं त्यांचं मत आहे.