देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहे. या कठिण काळात डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. अशातच एक मानवतेच्या दृष्टीकोनातून परिचारीका करत असलेल्या कामाचं वृत्त सूरतमधून समोर आलं आहे. ४ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या नर्स रुग्णांच्या सेवेत सातत्यानं झटत असल्याचं समोर आलं आहे. सध्या रमझानचा महिना सुरू असून त्या रोजादेखील ठेवत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचं नाव नॅन्सी आयझा मिस्त्री असं आहे आणि त्या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. असं असलं तरी त्या सूरत येतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी झटत आहेत. सध्या रमझानचा महिना सुरू आहे. या महिन्यात त्या आपला रोजा ठेवून रुग्णांचीही काळजी घेतला आहे. "मी नर्सप्रमाणे आपलं कर्तव्यच बजावत आहे. माझ्यासाठी रुग्णांची सेवा हिच इबादत आहे," असंही त्या म्हणाल्या.
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या महाभयंकर संकटात गर्भवती नर्स रोजा ठेवत करतेय रुग्णांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:51 IST
देशात सातत्यानं वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या. सध्या रमझानचा महिना सुरू असून रोजा ठेवत त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत.
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या महाभयंकर संकटात गर्भवती नर्स रोजा ठेवत करतेय रुग्णांची सेवा
ठळक मुद्देदेशात सातत्यानं वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्यासध्या रमझानचा महिना सुरू असून त्या रोजा ठेवत आपलं कर्तव्य बजावत आहेत.