शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दैवबलवत्तर म्हणून तो ट्रकखाली चिरडूनही जिवंत राहीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:17 IST

चीन : एखाद्याचा दिवस चांगला असेल तर तो व्यक्ती  अगदी एखाद्या ट्रेन किंवा ट्रकखाली आला तरी जिवंत राहू शकतो. मुंबईत लोकल ट्रेनखाली येऊनही कित्येक जणांना केवळ खरचटण्यापलीकडे काहीच झालं नसल्याची अनेक उदाहरण आहेत. असाच काहीसा प्रकार घडला आहे चीनमध्ये. एक व्यक्ती बाईकने रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकखाली आला. मात्र त्याचं दैवबलवत्तर म्हणून ...

ठळक मुद्देहा सगळा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एखाद्याचा दिवस चांगला असेल तर तो व्यक्ती  अगदी एखाद्या ट्रेन किंवा ट्रकखाली आला तरी जिवंत राहू शकतो.मात्र त्याचं दैवबलवत्तर म्हणून की काय तो सुखरुप वाचला. 

चीन : एखाद्याचा दिवस चांगला असेल तर तो व्यक्ती  अगदी एखाद्या ट्रेन किंवा ट्रकखाली आला तरी जिवंत राहू शकतो. मुंबईत लोकल ट्रेनखाली येऊनही कित्येक जणांना केवळ खरचटण्यापलीकडे काहीच झालं नसल्याची अनेक उदाहरण आहेत. असाच काहीसा प्रकार घडला आहे चीनमध्ये. एक व्यक्ती बाईकने रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकखाली आला. मात्र त्याचं दैवबलवत्तर म्हणून की काय तो सुखरुप वाचला. कदाचित त्याची वेळ आली असेल मात्र काळ आला नसेल.

गेल्या आठवड्यात साऊथ चीनमधल्या गियाँग या शहरात हा थरार घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती या वर्दळीच्या ठिकाणाहून जात होता. रस्ता क्रॉस करताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या बाईकला ठोकर दिली. त्यामुळे तो व्यक्ती थेट ट्रकच्या खाली आला. मात्र चालत्या ट्रकखाली येऊनही तो पुढच्या सेकंदात ट्रकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. मात्र त्याच्या बाईकला त्या ट्रकचालकाने कितीतरी मीटर फरफटत नेलं. ट्रकखाली आलेल्या व्यक्तीला थोडीशी दुखापत झाली आहे. उपचारानंतर तो बराही होईल. मात्र वेळीच तो इसम ट्रकखालून बाहेर आला त्यामुळे त्याचा जीव वाचला. जर त्याने समयसुचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. 

हा सगळा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही बराच व्हायरल झालाय. मिनिटभर जरी तो इसम ट्रकखालून बाहेर आला नसता तर ट्रकखाली येऊन चिरडला गेला असता अशाच प्रतिक्रिया या सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अपघतासाठी नेमकं कोण जबाबदार आहे याचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असून लवकरच ट्रकचालकाचाही शोध लावण्यात येणार आहे. अपघाताशी संबंधित आरोपींना शिक्षाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघात