शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

माकडांनी सांभाळ केला, जंगलातून वेश्यालयात पोहोचली आणि मग; महिलेची हैराण करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 10:14 IST

73 वर्षीय मरीना चॅपमॅन दावा करते की, माकडांनी तिचा सांभाळ केला. तिथेच ती या माकडांप्रमाणे खाणं, झाडांवर चढणं आणि झाडांवरच झोपणं शिकली. 

ही एका महिलेची अशी कहाणी आहे ज्यावर कुणालाही सहजपणे विश्वास बसत नाही. घरातून अपहरण करण्यात आल्यानंतर ही महिला माकडांसोबत जंगलात राहिली. ती कोलंबियाच्या जंगलांमध्ये एकटी फिरत होती. 73 वर्षीय मरीना चॅपमॅन दावा करते की, माकडांनी तिचा सांभाळ केला. तिथेच ती या माकडांप्रमाणे खाणं, झाडांवर चढणं आणि झाडांवरच झोपणं शिकली. 

नंतर मरीनाला कुणीतरी जंगलात पाहिलं आणि तिचं आयुष्य बदललं. तिला जबरदस्ती वेश्यालयात पाठवण्यात आलं.  पण त्यानंतर ती ब्रिटनमध्ये आली. एका व्यक्तीने तिच्यासोबत लग्न केलं. आता ती दोन मुलींची आई आहे आणि आपल्या परिवारासोबत राहते. 

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, मरीनाने आपली कहाणी 2013 मध्ये एका पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणली. तिच्या पुस्तकाचं नाव 'द गर्ल विद नो नेम' आहे. याची सहलेखिका त्यांची मुलगी आहे. त्यांची हीच कहाणी एका टीव्ही शो मध्ये दाखवण्यात आली. 

मरीनाच्या पावला पाउल देत आज तिची एक मुलगी वेनेसा फोरेरो कोबंलियात जंगलात असलेल्या एका गावात राहते. मरीना सांगिते की, ही घटना 1954 सालातील आहे. तेव्हा कोलंबियामध्ये बाल तस्करी खूप होत होती. तिचं अपहरण करण्यात आलं होतं. दोन लोकांनी तिला उचलून नेलं आणि जंगलात फेकलं होतं.

ती सांगते की, दोन दिवसांनंतर तिला माकडांचा एक ग्रुप दिसला. ती जिवंत राहण्यासाठी ते सगळं करू लागली जे माकड करत होते. माकड काय खातात, पाणी कुठे पितात आणि कुठे झोपतात ती बघत होती.

त्यानंतर ती माकडांसारखी दोन हात आणि दोन पायांवर चालत होती. तिने बोलणं बंद केलं होतं. माकडांनाही ती त्यांच्यासारखीच वाटली. ती म्हणाली की, एक दिवस एक छोटा माकड माझ्या खांद्यावर येऊन बसलं आणि दोन्ही हात त्याने तिच्या चेहऱ्यावर ठेवले. ते मला खूप आवडलं होतं. माकडांसोबत जंगलात मरीना 5 वर्ष राहिली. मग एक दिवस तिला जंगलात कुणीतरी बघितलं. 

या लोकांनी तिला वेश्यालयात पाठवलं. त्यानंतर ती कशीतरी तिथून पळाली आणि गल्ल्यामध्ये फिरू लागली. एक दिवस तिला एका परिवाराने घरातील काम करण्यासाठी विचारलं. ती राजधानी बोगोटामध्ये काम करत होती. ती ज्यांच्या घरी काम करत होती ते लोक ब्रिटनमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत होते. 

नंतर 1978 मध्ये सगळे लोक सहा महिन्यांसाठी ब्रॅडफोर्डमध्ये राहिले. इथे मरीनाची भेट जॉन चॅपमॅनसोबत झाली. तो चर्चमध्ये वाद्य वाजवत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी लग्न केलं. आज त्यांना दोन मुली आहे. एक वेनेसा 40 वर्षाची आणि जोआना 43 वर्षाची आहे. 

मरीनासाठी एका मनुष्यासारखं राहणं सोपं नव्हतं. सगळं काही तिला शिकावं लागलं. कसं जेवायचं आणि कपडे कसे घालायचे सगळं काही. पण काही गोष्टी ती अजूनही विसरू शकलेली नाही. ती शिटी वाजवते आणि झाडावर सहजपणे चढते.बाहेर फिरणं तिला जास्त आवडतं. तिला लोक फीमेल टार्जन म्हणतात. जेव्हा वेनेसाने आपल्या आईच्या कहाणीवर पुस्तक लिहिलं तेव्हा लोकांना हे सगळं काल्पनिक वाटलं. पण वेनेसा सांगते की, तिची आई ते सगळं करू शकते जे माकड करतात. अशात तिला या कहाणीवर विश्वास आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके