३४ कोटी रूपयांच्या कटोऱ्याचा बॉल ठेवण्यासाठी वापर, मालकांना माहीत नव्हती किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 11:51 AM2019-06-27T11:51:09+5:302019-06-27T11:52:16+5:30

वर्षानुवर्षे घरात पडून असलेल्या वस्तुदेखील तुम्हाला कोट्यधीश करू शकतात हे दाखवणारं एक उदाहरण समोर आलं आहे.

Family used 17th century bowl worth 34 crore to keep tennis balls | ३४ कोटी रूपयांच्या कटोऱ्याचा बॉल ठेवण्यासाठी वापर, मालकांना माहीत नव्हती किंमत!

३४ कोटी रूपयांच्या कटोऱ्याचा बॉल ठेवण्यासाठी वापर, मालकांना माहीत नव्हती किंमत!

Next

वर्षानुवर्षे घरात पडून असलेल्या वस्तुदेखील तुम्हाला कोट्यधीश करू शकतात हे दाखवणारं एक उदाहरण समोर आलं आहे. स्वित्झ्रर्लॅंडमधील एका दाम्पत्य ३४ कोटी रूपये किंमतीच्या एका कटोऱ्याचा वापर टेनिस बॉल ठेवण्यासाठी करत होते. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना या कटोऱ्याची किंमतच माहिती नव्हती. त्यांनी सांगितले की, त्यांनी हा कटोरा चीन प्रवासादरम्यान खरेदी केला होता.

तज्ज्ञांना बसला धक्का

ज्यांचा हा कटोरा आहे ते म्हणाले की, त्यांना नव्हतं माहीत की, हा कटोरा इतका किंमती आणि दुर्मिळ आहे. याबाबत त्यांना काही ऑक्शन एक्सपर्ट काही वस्तूंचा लिलाव करण्यासाठी आले तेव्हा कळाले. त्यांना हा कटोरा पाहिला आणि ते आश्चर्यचकित झाले.

बर्लिन म्यूझिअमने हा कटोरा ठेवण्यास दिला होता नकार

मालकांनुसार. बर्लिन म्युझिअमने सुद्धा हा कटोरा ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण म्युझिअममधील अधिकाऱ्यांना याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी लिलाव करणाऱ्या एका ब्रिटीश कंपनीला याचे फोटो दाखवले. पण त्यांनीही याला लिलावाचा भाग करण्यास नकार दिला.

लिलावात ३४ कोटी रूपये बोली

दोन्ही प्रस्ताव फेटाळले गेल्यावर दाम्पत्याने हा कटोरा सामान्य असल्याचं समजून याचा वापर घरात बॉल ठेवण्यासाठी सुरू केला. हा कटोरा घरात एक डिस्प्ले आयटमसारखा ठेवला होता. जेव्हा हे स्वित्झर्लॅंडच्या ऑक्शन एक्सपर्टनी लिलावात ठेवलं तेव्हा याची बोली ३४ कोटी रूपयांवर येऊन थांबली. लिलाव करणारी कंपनी कोलरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा फोटो शेअर केला.

परत चीनमध्ये गेला कटोरा

हॉंगकॉंगमध्ये झालेल्या लिलावात या कटोऱ्याला सर्वाधिक ३४ कोटी रूपये किंमत मिळाली. चीनमधील एका व्यक्तीने ही बोली लावली. हा कटोरा पितळेचा असून याच्या दोन्ही टोकांवर फीनिक्सचं डोकं कोरलं आहे.

Web Title: Family used 17th century bowl worth 34 crore to keep tennis balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.