आश्चर्यजनक! शारीरिक संबंधांमुळे नष्ट झाली होमो सेपियंसची एक अख्खी प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 11:30 AM2021-08-08T11:30:11+5:302021-08-08T11:33:14+5:30

Humans and Neanderthal: शास्त्रज्ञांनी शोधले निअँडरथल म्हणजेच होमो सेपियंसची प्रजाती नष्ट होण्यामागचे कारण

An entire species of Homo sapiens was destroyed by physical contact with humans | आश्चर्यजनक! शारीरिक संबंधांमुळे नष्ट झाली होमो सेपियंसची एक अख्खी प्रजाती

आश्चर्यजनक! शारीरिक संबंधांमुळे नष्ट झाली होमो सेपियंसची एक अख्खी प्रजाती

googlenewsNext

नवी दिल्‍ली: शास्त्रज्ञांनी निअँडरथल(Neanderthal) म्हणजेच होमो सेपियंसची लोकसंख्या कमी होण्यामागचं महत्त्वाचं कारण शोधलं आहे. त्यांच्या मते, मानव आणि निअँडरथल यांच्यातील शारीरिक संबंधांमुळे एक दुर्मिळ प्रकारच्या रक्त विकाराने निअँडरथलच्या संततीवर नकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली.

पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, निअँडरथल्सच्या रक्ताच्या नमुन्यांमधून असे दिसून आले की त्यांच्या रक्तात अनुवांशिक प्रकारांचा एक विशिष्ट संच आहे, ज्यामुळे ते गर्भ आणि नवजात (एचडीएफएन) रोगांच्या हेमोलाइटिक रोगांसाठी असंवेदनाशील होते. त्यामुळेच निअँडरथलमध्ये अशक्तपणा निर्माण होऊन त्यांचा नाश झाल्याची शक्यता आहे.

या आजाराने कमी झाली लोकसंख्या
HDFN मुळे निअँदरथलच्या मुलांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे मत आहे. निअँडरथल मानव हे होमो सेपियन्सचे विलुप्त सदस्य आहेत जे लाखो वर्षांपूर्वी पश्चिम युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत राहत होते. त्यांना मानवाची उपजाती मानली जाते. त्याची उंची सुमारे 4.5 ते 5.5 फूट होती. 2007 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार त्यांच्या केसांचा रंग लाल आणि त्वचेचा पिवळा होता.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, निअँडरथल्स आणि डेनिसोव्हन्सच्या रक्तगट प्रणालींच्या विश्लेषणातून त्यांचे मूळ, व्याप्ती आणि होमो सेपियन्सशी असलेले संबंध समजून घेण्यात मोठी मदत झाली आहे. मानवाचे पूर्वज आणि निअँडरथलमधील संबंधांमध्ये एचडीएफएन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच या आजारामुळेच त्यांच्यात एनीमिया झाला आणि निअँडरथलची प्रजाती कमजोर होऊन नष्ट झाली.

Web Title: An entire species of Homo sapiens was destroyed by physical contact with humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.