'या' देशांमध्ये सगळ्यात जास्त असतात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास, वाचा भारत कोणत्या स्थानावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:37 IST2025-01-15T12:34:27+5:302025-01-15T12:37:59+5:30

Longest Work Hours : भारतात कामाच्या तासांबाबत सुरू असलेल्या वादात आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सांगितलं की, भारत आधीच आंतरराष्ट्रीय ओव्हरवर्क क्षेत्रात आधीच वरच्या स्थानी आहे.

Employees work the longest hours in these countries, where India ranks! | 'या' देशांमध्ये सगळ्यात जास्त असतात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास, वाचा भारत कोणत्या स्थानावर!

'या' देशांमध्ये सगळ्यात जास्त असतात कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास, वाचा भारत कोणत्या स्थानावर!

Longest Work Hours : लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो (एलएंडटी) चे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी कामाच्या तासांबाबत पुन्हा एकदा वादाला हवा दिली आहे. त्यांनी सल्ला दिला की, कर्मचाऱ्यांना प्रतिस्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी रविवारसहीत आठवड्यातून ९० तास काम केलं पाहिजे. काही महिन्यांआधीच इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ति आणि शादी डॉट कॉम चे सीईओ अनुपम मित्तल यांच्यासहीत इतरही काही उद्योजकांनी अशीच मतं मांडली. भारतात कामाच्या तासांबाबत सुरू असलेल्या वादात आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सांगितलं की, भारत आधीच आंतरराष्ट्रीय ओव्हरवर्क क्षेत्रात आधीच वरच्या स्थानी आहे.

भारतात आठवड्याला किती तास काम करतात लोक?

ILO ने खुलासा केला की, जगातील सगळ्यात अधिक काम करणाऱ्या देशांमध्ये भारत १३व्या स्थानावर आहे. संघटनेनं असंही सांगितलं की, सरासरी भारतीय कर्मचारी आठवड्याला ४६.७ तास काम करतात. ज्यात भारतातील ५१ टक्के कर्मचारी प्रत्येक आठवड्यात ४९ किंवा त्यापेक्षा अधिक तास काम करतात. या आकडेवारीमुळे भारत सगळ्यात जास्त तास काम करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

कोणत्या देशात सगळ्यात जास्त काम करतात कर्मचारी?

ILO च्या रिपोर्टनुसार, खालील १० देश कामाच्या अधिक तासांबाबत सगळ्यात पुढे आहेत. 

१) लोकसंख्या कमी असूनही भूतानमधील लोक जगात सगळ्यात जास्त तास काम करतात. याबाबत भूतान पहिल्या क्रमांकावर आहे. येथील कर्मचारी साधारण आठवड्याला ५४.५ तास काम करतात.

२) संयुक्त अरब अमीरात या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील कर्मचारी त्यांची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी आठवड्याला ५०.९ तास काम करतात.

३) लेसोथोमध्ये लोक आठवड्याला ५०.४ तास काम करतात. त्यामुळे हा देश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

४) सगळ्यात जास्त तास काम करणाऱ्या देशांच्या यादीत कांगो चौथ्या स्थानावर आहे. येथील कर्मचारी आठवड्याला ४८.६ तास काम करतात.

५) या यादीत पाचव्या क्रमांकावर कतार आहे. येथील कर्मचारी आठवड्याला सरासरी ४८ तास काम करतात.

६) सहाव्या क्रमांकावर लायबेरिया हा देश आहे. येथील कर्मचारी आठवड्याला ४७.७ तास काम करतात.

७) या यादीत पुढील क्रमांकावर मॉरिटानिया आहे. येथील कर्मचारी आठवड्याला ४७.६ तास काम करतात.

८) आठव्या क्रमांकावर लेबनाना हा देश आहे. येथील कर्मचारी आठवड्याला सरासरी ४७.६ तास काम करतात.

९) आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनुसार, मंगोलियातील कर्मचारी आठवड्याला ४७.३ तास काम करतात.

१०) १०व्या क्रमांकावर जॉर्डन आहे. येथील लोक आठवड्याला सरासरी ४७ तास काम करतात.

सगळ्यात कमी तास काम करणारे देश

ILO नुसार, वानुअतु सगळ्यात कमी सरासरी तास काम करणारा देश बनला आहे. वानुअतुमध्ये कर्मचारी आठवड्याला सरासरी केवळ २४.७ तास काम करतात. तर किरिबातीमधील कर्मचारी आठवड्याला २७.३ तास आणि मायक्रोनेशियामधील कर्मचारी आठवड्याला सरासरी ३०.४ तास काम करतात.
 

Web Title: Employees work the longest hours in these countries, where India ranks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.